agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नुकसानग्रस्त सोयाबीनची कृषी संचालकांकडून पाहणी

राज्याचे गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी मंगळवारी (ता. २६) डोर (ता. अर्धापूर) शिवारातील बालाजी कदम यांच्या बुरशीमुळे पिवळे पडून वाळत असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

नांदेड : राज्याचे गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी मंगळवारी (ता. २६) डोर (ता. अर्धापूर) शिवारातील बालाजी कदम यांच्या बुरशीमुळे पिवळे पडून वाळत असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली.

या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी अनिल शिरफुले, कृषी सहायक विजयानंद भोसले आदी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शेंगा भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन पिवळे पडून वाळत असल्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहे. या रोगाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने एका दिवसातच शेत पिवळे पडत आहे. याबाबत शेतकरी धास्तावले आहेत. ‘ॲग्रोवन’मधून सातत्याने वृत्त प्रकाशित केले आहे.

याची दखल मंगळवारी (ता. २६) नांदेड दौऱ्‍यावर आलेल्या पाटील यांनी घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी अर्धापूर तालुक्यातील देगाव, डोर, मालेगाव येथे पाहणी केली. डोर येथील बालाजी कदम यांच्या शेतात बुरशीजन्य रोगामुळे पिवळे पडलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली.

दरम्यान, पाटील यांनी डोर येथील सतीश कदम यांच्या शिवार शेतकरी उत्पादक कंपनीसह मालेगाव येथील शेतकरी मित्र उत्पादक कंपनीच्या विविध उपक्रमांची पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT