Collector Abhijit Raut  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Input Center : जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी केंद्रांची झाडाझडती

Collector Abhijit Raut : खरीप पेरणीच्या तोंडावर जिल्ह्यात बियाणे व खते अधिकच्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी (ता. १२) नवा मोंढा बाजारातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना भेटी दिल्या.

Team Agrowon

Nanded News : खरीप पेरणीच्या तोंडावर जिल्ह्यात बियाणे व खते अधिकच्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी (ता. १२) नवा मोंढा बाजारातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना भेटी दिल्या.

या वेळी कपाशी, सोयाबीन बियाणांची उपलब्धता, विक्री याची माहिती घेऊन विक्रेत्यांना बियाणे तसेच रासायनिक खते योग्य दरात देण्याचे निर्देश दिले.

या वेळी सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक बी. बी. गिरी, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी सचिन कपाळे, नांदेड तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोळके, नांदेड पंचायत समिती कृषी अधिकारी छाया देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात आगामी खरीप पेरणी संदर्भात शेतकरी बियाणे तसेच खतांच्या खरेदीसाठी कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर गर्दी करत आहेत. अशावेळी कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून कपाशी तसेच सोयाबीनच्या काही वाणांची अधिकच्या दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

याबाबत जिल्हाधिकारी राऊत यांनी कृषी निविष्ठा विक्रेते, खत व बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा पुरवठ्यासह ते योग्य किमतीत देण्याच्या सूचना केल्या होत्या. या बाबत प्रत्यक्ष खातरजमा करण्यासाठी त्यांनी बुधवारी (ता. १२) नवा मोंढा बाजारात असलेल्या कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना भेट दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT