Drought Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : दुष्काळ तालुका निवडीत मंगळवेढ्यावर अन्याय

Maharashtra Drought : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्यामुळे खरिपाचे पीक संपूर्णपणे जळून गेले आहे.

Team Agrowon

Solapur News : शासनाच्या वतीने ‘ट्रिगर वन’ अँड ‘ट्रिगर टू’ या निकषाच्या आधारे जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्याच्या यादीत मंगळवेढ्याचा समावेश नसल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांतून शासनाच्या निकषाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंगळवेढ्यावर केल्या जाणाऱ्या अन्यायाची परंपरा आताही कायम राहिली.

तालुक्यातील शेती नदीकाठ व कालव्यावर अवलंबून आहे. उर्वरित भाग हा जिरायत क्षेत्राशी संबंधित आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी ठराविक क्षेत्राला मिळत असल्यामुळे जिरायत क्षेत्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र यंदाच्या खरीप हंगामात पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्यामुळे खरिपाचे पीक संपूर्णपणे जळून गेले आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२५ टक्के नुकसान भरपाई देण्यासंदर्भात विमा कंपनीने सुरवातीला हुलजंती व आंधळगाव ही दोन महसूल मंडले घेतली होती. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन तर आमदार समाधान आवताडे यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत पाठपुरावा केल्यानंतर उर्वरित मंडलांचा चौकशी करून समावेश करणार असल्याचे सांगण्यात आले.

मात्र नुकतीच ट्रिगर वन व ट्रिगर टू याचा आधार घेत दुष्काळी तालुके जाहीर केले. मात्र यात मंगळवेढ्याचा समावेश नाही. राजकीय पातळीवरून जाणूनबुजून वगळण्यात आले. तालुका कुठल्या निकषात बसला नाही, याबाबत विचारणा होत आहे.

आवताडेंनी शक्ती पणाला लावण्याची आली वेळ२०१२-१३ मध्ये दुष्काळी तालुक्याच्या यादीतून मंगळवेढा तालुक्याला वगळण्यात आले होते. परंतु तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्व. आमदार भारत भालके यांनी प्रयत्न करून मंगळवेढ्यासाठी दुष्काळासाठीचा स्वतंत्र जीआर काढण्यास भाग पाडले. तशा पद्धतीने आपली राजकीय ताकद आमदार समाधान आवताडे यांनी सत्ताधारी पक्षाकडे लावावी, अशी मागणी जोर धरत आहे.

प्रशासनाच्या चुकीच्या अहवालामुळे तालुक्यावर अन्याय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत मेलद्वारे निवेदन पाठवले असून येत्या काही दिवसांत मंगळवेढ्याचा समावेश करण्याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- प्रतीक किल्लेदार, शहराध्यक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT