Turmeric  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Research Center : वसमत हळद संशोधन केंद्रामध्ये पायाभूत बेणे उत्पादन कार्यक्रम

Seed Production : वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या प्रक्षेत्रावर यंदा (२०२३-२४) हळदीच्या ३३ वाणांचे संशोधन प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत.

माणिक रासवे

Hingoli News : जिल्ह्यातील वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या प्रक्षेत्रावर यंदा (२०२३-२४) हळदीच्या ३३ वाणांचे संशोधन प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. त्यात हळदीच्या तीन वाणांचे पायाभूत बेणे उत्पादन कार्यक्रम घेण्यात आला आहे. त्याद्वारे शुद्ध बेणे उपलब्ध होईल, अशी माहिती संशोधन केंद्राच्या सूत्रांनी दिली.

गुरुवारी (ता. ४) हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील, लातूर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी प्रक्षेत्रास भेट देऊन पाहणी केली. वसमतचे तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे, हळद संशोधन केंद्राचे तंत्राधिकारी रमेश देशमुख, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांनी संशोधन प्रक्षेत्रावरील चालू असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध कामांची पाहणी केली. प्रक्षेत्रावर या वर्षी लागवड करण्यात आलेल्या हळदीच्या विविध वाणांची पाहणी केली. उत्तमरीत्या व्यवस्थापन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या भागासाठी चांगले उत्पादन देणारे, कीड व रोगांना कमी बळी पडणारे तसेच कुरकुमीनचे अधिक प्रमाण असलेल्या जातींची निवड करून भविष्यात या वाणांतून चांगले वाण शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना मान्यवरांनी दिल्या. प्रक्षेत्रावर हाती घ्यावयाच्या विविध कामांच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली.

दिवेकर म्हणाले, की हिंगोली जिल्ह्यासह परभणी, नांदेड, अकोला, वाशीम, लातूर हळद उत्पादनामध्ये अग्रेसर असून, या भागातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना हळदीच्या विविध वाणांची माहिती व्हावी यासाठी कृषी विभागाने हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी या ठिकाणी आयोजित करव्यात. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी वसमत यांनी या प्रक्षेत्रावर हळद उत्पादक शेतकऱ्यांचे मेळावे घ्यावेत. प्रशिक्षणे आयोजित करावीत.

पाटील म्हणाले, की हळद काढणी व शिजवणे हे काम खूप श्रम आहे. शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी हळद संशोधन केंद्र काम करेल. हळद निर्यात व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले जातील. हळद प्रक्रियेशी संबंधित सर्व संस्थांसोबत या केंद्राच्या वतीने सामंजस्य करार करण्यात येत आहेत. भारतातील हळद संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे व हळदीशी संबंधित संस्था यांच्या समन्वयातून हे संशोधन केंद्र भारतासह जगातील उत्कृष्ट केंद्र ठरेल, असा विश्वास खासदार पाटील यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT