Vegetables Rate agrowon
ॲग्रो विशेष

Vegetables Rate : महापुराचा भाजीपाला मार्केटवर परिणाम, आवक मंदावल्याने बाजारभावात अस्थिरता

Vegetables Rate Market : कोथिंबीर, मेथी, शेपू, पालकची आवक इतर भाज्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे दहा रुपयांस दोन पेंढ्या असा भाव मिळत होता.

sandeep Shirguppe

Vegetables Rate Decrease : कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यांतून कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या पालेभाज्यांची आवक निम्म्यावर आली आहे. त्यात टोमॅटो, वांगी, दोडक्याचे दर वीस रुपयांनी खाली आले आहेत. गवार, कांदा, बटाट्याचे दर स्थिर असून, लिंबू दहा रुपयांस सहा नग असा भाव आहे.

मिरचीचा दर ४० ते ६० रुपये प्रतिकिलो आहे. मिरज, शिरोळ, आदी भागांतून येणाऱ्या पालेभाज्यांची पुरामुळे वाहतूक बंद झाली आहे. विशेष म्हणजे कडधान्यांवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे तयार मोड आलेल्या मटकी, मसूर, हरभरा, छोले, काळे वाटाणे, आदींना मागणी वाढली आहे.

कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक स्वस्त

कोथिंबीर, मेथी, शेपू, पालकची आवक इतर भाज्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे दहा रुपयांस दोन पेंढ्या असा भाव मिळत होता.

गवार, बटाटा, कांदा दर स्थिर

कोरड्या कांद्याला ग्राहकांतून मागणी अधिक आहे. त्यामुळे ३५ ते ४० रुपये असा प्रतिकिलोचा दर आहे. याशिवाय बटाटा (इंदोरी) ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो, तर नियमित बटाटा ३५ ते ४० रुपये किलो असा भाव मिळत आहे. गवारीचा दर अद्यापही ८० ते १०० रुपये प्रतिकिलो असा आहे.

टोमॅटो वीस रुपयांनी स्वस्त

मागील आठवड्यात टोमॅटोचा प्रतिकिलोचा दर ८० ते १०० रुपये असा होता. मागणीअभावी या आठवड्यात हाच दर ४० ते ६० रुपये असा पडला आहे.

पालेभाज्यांचे दर

कांदापात १० रु. पेंढी, मेथी १० रु. दोन पेंढ्या, कोथिंबीर १० रु. दोन पेंढ्या, पोकळा १० रु. पेंढी, शेपू १० रु. दोन पेंढ्या, पालक १० रु. पेंढी

फळभाज्यांचे किलोचे दर (रुपयांत)

वांगी ४० ते ६०, दोडका ४० ते ६०, काकडी ४०, काटेरी काकडी ३० ते ४०, कारली ४० ते ६०, हिरवी मिरची ४०, ढब्बू मिरची ४०, भेंडी ४० ते ५०, वरणा ४०, पापडी ४० ते ७०, गवारी ८० ते १००, दुधी भोपळा १० ते ३० रु. नग.

फळांचे किलोचे दर (रुपयांत)

सफरचंद (इराण) लहान १०० ते १६०, सफरचंद (वॉशिंग्टन) २२० ते ३००, सफरचंद (तुर्की) १८० ते २२०, संत्री ११० ते १६०, सीताफळ ८० ते १००, चिकू ८० ते १००, ड्रॅगन फ्रुट १४० ते २००, केळी (जवारी) ५० ते ७० रु. डझन, केळी (साधी) २० ते ५० रु. डझन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT