Sugarcane Production Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Production Kolhapur : उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव, उत्पादन घटण्याची भिती

Agriculture Damage : लोकरी माव्याचा वाढता प्रसार रोखण्यासाठी तालुका कृषी विभागाने मार्गदर्शन करावे; अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Dieses : कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले दरम्यान अचानक बंद झालेल्या पावसाने पिकांना किडीचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात ऊस पीक जोमदार आले होते; पण जुलैअखेर कासारी नदीला महापूर आला आणि नदीकाठच्या उसाचे प्रचंड नुकसान झाले. १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे लोकरी माव्याने डोके वर काढले आहे. पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ आणि कागल तालुक्यातही याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.

उसावर प्रसार झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी उसाचे माव्यापासून नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशके फवारणी करावी लागत आहे. लोकरी माव्याचा वाढता प्रसार रोखण्यासाठी तालुका कृषी विभागाने मार्गदर्शन करावे; अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

कासारी नदीला बारमाही मुबलक पाणी उपलब्ध असल्याने बहुतांशी शेतकरी उसाचे पीक घेतात. यंदा उन्हाळ्यात वळिवाने ओढ दिली. तसेच सुरवातीला मॉन्सून पावसाने दमदार सुरवात केली. ऊन व पाऊस वातावरण ऊस पिकासाठी पोषक ठरले. ऊस तजेलदार होऊन वाढ जोमदार झाली.

उसामध्ये शर्करेचे प्रमाण वाढले. सध्या उष्ण दमट हवामानामुळे उसावर पांढऱ्या लोकरी माव्याचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. लोकरी माव्याचे कीटक उसाच्या पानातील शर्करा शोषून घेतात. यामुळे उसाची वाढ खुंटते व नुकसान होऊन उत्पादन घटते. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे.

लोकरी माव्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटनाशके वापरावीत. १५ लिटर पाण्यात १५ ते २० मिली कीटकनाशक मिसळून उसावर फवारणी करावी. तसेच जैविक पद्धतीचा वापर करूनसुद्धा लोकरी माव्याचा प्रसार कमी करता येतो. यासाठी कृषी महाविद्यालयात मित्र कीटक अळी मिळते.

- राजगोंडा चौगले, कृषी अधिकारी आत्मा विभाग, पन्हाळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

Onion Prices Issues: बागलाण तहसीलमध्ये कांदा दरासाठी ठिय्या

Medical Shop Strike: औषध विक्रेत्यांचा आज संप

Jal Jeevan Mission: नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या : आमदार यड्रावकर

Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर

SCROLL FOR NEXT