Kaju Agrowon
ॲग्रो विशेष

Kaju Pest Infestation : काजू पिकावर फूलकिडींचा प्रादुर्भाव

Kaju Orchard Issue : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या सात-आठ दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काजू पिकावर फूलकिडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे काजू बागायतदारांची धास्ती वाढली आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या सात-आठ दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काजू पिकावर फूलकिडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे काजू बागायतदारांची धास्ती वाढली आहे.

जिल्ह्यात ३ डिसेंबरपासून विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडत आहेत. ७ डिसेंबरला जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी झाल्या. याशिवाय १ ते ८ डिसेंबर या कालावधीत सतत ढगाळ वातावरण राहिले. या वातावरणाचा परिणाम आता काजू पिकावर दिसून येऊ लागला आहे.

जिल्ह्यातील ७० ते ८० टक्के काजू पिकाला पालवी आणि मोहर आलेला आहे. या पिकावर आता फूलकिडींचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीच एक फवारणी पूर्ण केली आहे.

परंतु आता कीड-रोग वाढत असल्याने पुन्हा आणखी एक फवारणी करावी लागणार आहे. त्यातच पावसाची शक्यता असल्यामुळे रविवारपर्यंत (ता. ८) शेतकऱ्यांनी फवारणी टाळली. अनेक झाडांना कोवळी पालवी असल्यामुळे टी-मॉस्किटोचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या थंडीमुळे काजूला चांगली पालवी फुटली होती. मोहरदेखील चांगला येत होता. परंतु पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काजू पिकावर कीड-रोग वाढले आहेत.
प्रवीण गायकवाड, काजू उत्पादक, खांबाळे, ता. वैभववाडी
पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काजू पिकावर टी-मॉस्किटोचा अधिकतर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस थांबताच तातडीने विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी. सतत एकाच कीटकनाशकाची फवारणी घेऊ नये.
प्रा. विवेक कदम, काजू अभ्यासक, सांगूळवाडी कृषी महाविद्यालय, वैभववाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC Action: मुंबई बाजार समितीत अन्न, औषध प्रशासनाची कारवाई

Monsoon 2026: मॉन्सूनची आगेकूच

Banana Sapling Shortage: युद्धामुळे टिश्युकल्चर केळी रोपांची टंचाई

Sugarcane Control Order: ‘ऊस नियंत्रण’ मसुदा तूर्त मागे

Agriculture Fertilizers Sales: खतांची अतिखरेदी

SCROLL FOR NEXT