Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development: उद्योगांनी ग्रामीणस्तर उंचावण्यासाठी मदत करावी

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगांनी सामाजिक दायित्व निधीतून ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य आणि विकासासाठी मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

गणेश कोरे

Pune News: समाजाच्या विकासासाठी उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीतून सामाजिक बांधिलकी ठेवून ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य सेवेबरोबरच ग्रामीणस्तर उंचावण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित चॅम्पियन ऑफ चेंज-सीएसआर ॲवॉर्ड या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. या वेळी प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेने विविध सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) क्षेत्रातील भागीदारांना एकत्र आणून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रभावी मंच उभा केला आहे. हे इतर जिल्ह्यांसाठी अनुकरणीय आहे.याद्वारे शैक्षणिक गुणवत्ता विकास व आरोग्य सेवा बळकटीकरण व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी हाती घेतलेल्या या पथदर्शी प्रकल्पाला सीएसआरच्या माध्यमातून साथ देऊन पुणे जिल्हा देशात अग्रेसर राहील यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा.’’

शाळा परिवर्तन म्हणजे समाज परिवर्तन, पुणे मॉडेल स्कूल या उपक्रमाअंतर्गत डिजिटल शाळा ही संकल्पना जिल्हा परिषद राबविणार असून यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण, सर्व सुविधा, प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात विविध उद्योगांनी पुढाकार घेतल्यामुळे हे शक्य होणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सीएसआर भागीदार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे या माध्यमातून दिसून येते, असेही पवार म्हणाले. कार्यक्रमात शिक्षण व खेळ प्रोत्साहन, आरोग्य व स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, उत्पन्न निर्मिती व कौशल्य विकास, समाज सक्षमीकरण या पाच विभागांमध्ये विविध सोळा उद्योगांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT