Chana Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Cultivation : हरभरा क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरवर पोहोचण्याचे संकेत

Chana Sowing : खानदेशात पाऊसमान चांगले आहे. सर्वच जिल्ह्यांत रब्बीची पेरणी गतीने सुरू आहे.

Team Agrowon

Jalgoan News : खानदेशात पाऊसमान चांगले आहे. सर्वच जिल्ह्यांत रब्बीची पेरणी गतीने सुरू आहे. हरभरा पेरणी अपवाद वगळता पूर्ण झाली आहे. यंदा पेरणी सव्वादोन लाख हेक्टरवर जाईल, असे संकेत आहेत.

रब्बी पीक जोमात येईल. रब्बीचा पेरा १०० ते ११० टक्के होईल, असे चित्र आहे. खानदेशात हरभऱ्याची पेरणी यंदा ऑक्टोबरमध्ये सुरू झाली. क्षेत्र यंदा सुमारे १५ ते २० हजार हेक्टरने वाढले आहे. काही भागात मोठ्या काबुलीची पेरणी सुरू आहे. हरभरा क्षेत्र अडीच लाख हेक्टरवर पेरणी होईल, अशी माहिती आहे. हरभऱ्यापाठोपाठ तृणधान्य पिकांची पेरणी सुरू आहे.

पावसाने दिलासा

यंदा ओलावा चांगला होता. तसेच पाऊसमान चांगले राहिल्याने जलसाठे बऱ्यापैकी आहेत. यामुळे पेरणीला अनुकूल स्थिती होती. रब्बीत हरभरा पेरणीत मोठी वाढही दिसत आहे. अनेकांनी सूक्ष्मसिंचनाच्या मदतीने मोठा काबुली, लहान काबुलीची पेरणी केली आहे. सर्वच शेतकऱ्यांकडे मुबलक जलसाठे नसल्याने मका, ज्वारी ऐवजी हरभऱ्याची पेरणी झाली आहे.

कारण हरभरा कमी खर्च व कमी पाण्यात येतो. खानदेशात मागील वर्ष वगळता पूर्वीची तीन वर्षे रब्बीची चार लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात फक्त मागील हंगामात पेरणी कमी पावसाने घटली होती. परंतु मागील वेळेसही हरभऱ्याची सर्वाधिक एक लाख ९० हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र पेरणीत आणखी काहीशी वाढ होईल, असे मानले जात आहे.

अनेक शेतकरी परंपरेनुसार हरभरा पेरणीचे नियोजन करतात. हरभरा कमी खर्च व कमी पाण्यात येणारे पीक आहे. यंदा पेरणीत किंचीत किंवा १० ते १२ हजार हेक्टरने वाढ होईल, असे सध्या दिसत आहे. अनेकांनी काबुली किंवा डॉलर (मॅक्सिको) हरभऱ्याची पेरणी केली आहे. यामुळे क्षेत्रात वाढही झाली आहे.

काबुलीची पेरणी धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल भागात झाली आहे. कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी यंदा बऱ्यापैकी झाली. उडीद, मूग, सोयाबीनचे पीक आल्यानंतर त्यात हरभरा पेरणी झाली. अजूनही ओलावा काळ्या जमिनीत चांगला आहे. यामुळे पीक तरारले आहे.

काळ्या कसदार जमिनीत अधिकची पेरणी

हरभरा पेरणीस खानदेशात जळगावमधील रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागातील शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. मका पीक खर्चिक बनले आहे. त्यास पाणी व फवारण्या अधिक लागतात. तसेच अमेरिकन लष्करी अळीचेही संकट असते. यामुळे अनेकांनी मका पिकाऐवजी हरभऱ्याची पेरणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT