Indian Constitution Park Agrowon
ॲग्रो विशेष

Preamble Park Nagpur : देशातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क नागपुरात

Nagpur Constitution Park : देशातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आले आहे.

Team Agrowon

Nagpur News : देशातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आले आहे. या संविधान प्रस्तावना पार्कचे लोकार्पण देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या होणार आहे.

नागपूर विद्यापीठाने नुकतेच शताब्दी वर्ष साजरे केले, तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे शताब्दी वर्ष साजरे होत आहे. अशा या सुवर्णमय योगात विदर्भाचे सुपुत्र सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते संविधान प्रस्तावना पार्कचे लोकार्पण होणे ही निश्चितच एक अनोखी, अविस्मरणीय आणि ऐतिहासिक घटना ठरेल.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या संविधान प्रस्तावना पार्कचे लोकार्पण २८ जून रोजी होणार आहे. या लोकार्पण समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

विधी महाविद्यालय परिसरात संविधान प्रस्तावना पार्कच्या उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण होत आहे आणि या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचा आम्हाला आनंद आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य रविशंकर मोर यांनी नमूद केले. या संविधान प्रस्तावना पार्कला भेट देणाऱ्या लोकांना संविधानातील मूल्यांचे रक्षण करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकशाहीच्या आधारस्तंभांची प्रतिकृती

या संविधान प्रस्तावना पार्कमध्ये लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ म्हणजेच राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या प्रतिकृती देखील तयार करण्यात आली आहेत. या संविधान पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वारही उभारण्यात आले आहे.

दहा मूल्यांचे भित्तिचित्र

संविधान प्रस्तावना पार्कच्या मध्यभागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान हातात धरलेली प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. तसेच, यामध्ये सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, प्रजासत्ताक, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय, स्वातंत्र्य आणि समता या संविधान प्रस्तावनेतील दहा मूल्यांचे भित्तिचित्र (म्यूरल) लावण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT