PC FM Agrowon
ॲग्रो विशेष

India Pakistan War : पाकिस्तानने २६ ठिकाणी केला हवाई घुसखोरीचा प्रयत्न; भारताने दिलं चोख प्रत्युत्तर

Indian Army response : पाकिस्तानने शुक्रवारी (ता.९) रात्री भारताच्या काही भागात हवाई हल्ले केले. तसेच जोरदार गोळीबार केला. नियंत्रण रेषेवर २६ ठिकाणी पाकिस्तानने हवाई घुसखोरी पुन्हा प्रयत्न केला. मात्र भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Dhananjay Sanap

Line of Control : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढू लागला आहे. मागील तीन दिवसांपासून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा ओलांडून हल्ले सुरूच असल्याची माहिती परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी शनिवारी (ता.१०) सकाळी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग उपस्थित होत्या.

पाकिस्तानने शुक्रवारी (ता.९) रात्री भारताच्या काही भागात हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला. तसेच सीमारेषेवर जोरदार गोळीबार केला. नियंत्रण रेषेवर २६ ठिकाणी पाकिस्तानने हवाई घुसखोरी पुन्हा प्रयत्न केला. मात्र भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. परंतु तरीही भारताच्या उधमपुर, पठाणकोट, भुज, आदमपुर आणि भटिंडा येथे नुकसान झालं आहे, असं कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या.

पाकिस्तानकडून भारतामध्ये धार्मिक फुट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तान शाळा, वैद्यकीय सेवा केंद्र आणि नागरी वस्त्यांवर हल्ले करत आहे. तरीही भारतीय लष्कराने संयम कायम ठेवला आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. तसेच पाकिस्तानची नागरी वस्त्यांवर हल्ला करण्याची बेजबाबदार वृत्ती उफाळून समोर आल्याचं परराष्ट्र सचिव म्हणाले.

भारतावर हल्ले करून अनेक महत्त्वाचे ठिकाण उद्ध्वस्त केल्याच्या बातम्याही पाकिस्तानकडून प्रसारित केल्या जात आहेत. परंतु त्या सर्व खोट्या आहेत. पाकिस्तानने लाहोरमधील नागरी विमान उड्डाणाच्या आडोसा घेत आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांचा दुरुपयोग केला, असं कर्नल कुरेशी म्हणाल्या.

आदमपुरमधील एस-४०० प्रणाली, सुरजगड, हवाई अड्डे, नागरोटा ब्रम्हो स्पेस, बहरागिरी तोफाखाना, चंडीगड येथील विविध ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचे खोट्या बातम्या पसरवल्या आहेत. यामध्ये तथ्य नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. तसेच पाकिस्तानकडून सीमेवर सैन्य बळ वाढवले जात आहे. त्यामुळे एकप्रकारे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT