Ethanol Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Blending : इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १६.२३ टक्क्यांवर

Ethanol Production : गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारने युद्ध पातळीवर व अग्रक्रमाने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : सरत्या वर्षअखेर इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १६.२३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. बहुतांशी ठिकाणी इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविण्यात येत असल्याने इथेनॉलला सातत्याने मागणी आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माहितीनुसार, इथेनॉल पुरवठा वर्ष २०१३-१४ मध्ये ३८ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले होते.

गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारने युद्ध पातळीवर व अग्रक्रमाने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले. एक खिडकी योजनेअंतर्गत नव्या प्रकल्पांना मंजुरी दिली यामुळे ऊस साखरेसह अन्नधान्यावरील इथेनॉल प्रकल्प मोठ्या प्रमाणात वाढले. याचा सकारात्मक परिणाम इथेनॉल निर्मितीवर दिसून येत आहे.

इंधन कंपन्यांनी देशभरातील सुमारे साडेसतरा हजार इंधन विक्री केंद्रांवर (पेट्रोल पंप) इथेनॉल मिश्रणासाठी दिले आहे. यंदाच्या सत्रात ९३० कोटी लिटरचे वाटप कंपन्यांना करण्यात आले आहे. यंदा इथेनॉल निर्मितीवरील सर्व बंधने सरकारने काढून टाकली असली तरी साखर कारखाने वगळता धान्यावर आधारित इथेनॉल निर्मितीला मर्यादा येत आहेत.

सध्या बहुतांशी इथेनॉल हे मक्यापासून तयार केले जाते. त्याला मागणी ही जास्त आहे. पण ज्या प्रमाणात या इथेनॉलची निर्मिती अपेक्षित आहे त्या प्रमाणात ती होत नाही. यंदाच्या खरीप हंगामातील मका इथेनॉल प्रकल्पांना अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्याचे चित्र आहे.

मक्याच्या किमती, उपलब्धता आणि त्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमती उत्पादकांना परवडत नसल्याने तांदळासारख्या अन्य धान्याचा पुरवठा केंद्राने करावा, अशी मागणी आहे.

यंदाचा साखर हंगाम मध्यावर आला असून साखर कारखान्यांनी यंदा इथेनॉल निर्मिती सुरू केली असली तरी एकूण मागणीच्या तुलनेत उत्पादनाचे प्रमाण कमी आहे. अशा परिस्थितीतही इथे तेल कंपन्या जुना साठा व नवीन इथेनॉल याचा मेळ घालत इथेनॉलचे मिश्रण करीत आहेत.

इथेनॉलमुळे कारखान्यांना दिलासा

इथेनॉल निर्मिती प्रकल्पांपुढे सध्या कच्च्या मालाचे आव्हान असले तरी सध्या सुरू असलेल्या इथेनॉलच्या वापरामुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांची देणी वेळेत देण्यासाठी होत असल्याचा दावा केंद्रीय अधिकाऱ्यांचा आहे. इथेनॉलमुळे पेट्रोल वरील भार हलका होत असल्याने कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन वाचत असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT