Kolhapur Assembly Elections agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Assembly Elections : कोल्हापुरात अपक्ष डोकेदुखी वाढवणार, ३ दिवस सुट्टीमुळे सोमवारी उडणार झुंबड

Kolhapur Politics : शौमिका महाडिक यांनी आपला एक अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. आमदार ऋतुराज पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले दोन उमेदवारी अर्ज माघारी घेतले.

sandeep Shirguppe

Assembly Elections Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या चौघांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यामध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघातून गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी आपला एक अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला.

आमदार ऋतुराज पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले दोन उमेदवारी अर्ज माघारी घेतले, तर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतला.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेतली. जिल्ह्यामध्ये एकूण १० विधानसभा मतदारसंघांपैकी २ विधानसभा मतदारसंघातून ४ उमेदवारांनी ५ उमेदवारी अर्ज माघारी घेतले.

१० विधानसभा मतदारसंघांमध्ये ३० पेक्षा अधिक अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील बहुतांशी जणांचे अर्ज वैध ठरले असून, सध्या तरी ते रिंगणात आहेत. राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. सोमवारी शेवटचा दिवस असून, सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. शुक्रवार (ता. १), शनिवार (ता.२) आणि रविवारी (त.३) सुटी असल्याने अर्ज माघारी घेता येणार नाहीत.

महाविकास आघाडीकडून नाराजांची मनधरणी

महाविकास आघाडीत जेथे नाराजी आहे तेथे जुळवून घेण्यासाठी गुरूवारी (ता.३१) उशिरा रात्री शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खलबते झाली. दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांकडून मदत झाली पाहिजे, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचाही निर्णय बैठकीत झाला.

दरम्यान, आमदार सतेज पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या ‘राधानगरी’ आणि ‘शाहूवाडी’ मतदारसंघातसुद्धा बैठका घेण्याचा निर्णय झाला. ठाकरे सेनेचे कार्यकर्ते जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी काम करतील, असा विश्‍वास संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sericulture : अल्पभूधारकाने मिळवली दर्जेदार चॉकी निर्मितीत ओळख

Agriculture AI : ‘एआय’द्वारे घडेल सदाहरित कृषिक्रांती

Flower Market : फुलांच्या आकर्षक हारांसाठी प्रसिध्द सुपे बाजार

Lumpy Vaccine : ‘लम्पी’ लस ठरणार मैलाचा दगड

Mango Cashew Insurance : तीनशे आंबा-काजू बागायदार विमा परताव्यापासून वंचित

SCROLL FOR NEXT