Coconut Market Agrowon
ॲग्रो विशेष

Coconut Market : सुके खोबऱ्याच्या एमएसपीत २५० ते ३०० रुपयांनी वाढ

Coconut Rate : सरकारने बुधवारी (ता. २७) २०२४ हंगामासाठी सुक्या खोबऱ्याचे (कोपरा) किमान आधार मूल्य (एमएसपी) २५० ते ३०० रुपये प्रतिक्विंटलने वाढवून ११,१६० ते १२,००० रुपये प्रतिक्विंटल करण्याची घोषणा केली.

Team Agrowon

Coconut News : नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः सरकारने बुधवारी (ता. २७) २०२४ हंगामासाठी सुक्या खोबऱ्याचे (कोपरा) किमान आधार मूल्य (एमएसपी) २५० ते ३०० रुपये प्रतिक्विंटलने वाढवून ११,१६० ते १२,००० रुपये प्रतिक्विंटल करण्याची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले, की जागतिक स्तरावर खोबऱ्याच्या किमती घसरल्या आहेत. पण मोदी सरकारने उत्पादन खर्चापेक्षा किमान ५० टक्के जास्त ‘एमएसपी’ देण्याचा निर्णय घेतला आहे.

अशा परिस्थितीत २०२४ च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या ‘एमएसपी’मध्ये २५०-३०० रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे. ते म्हणाले, की योग्य आणि सरासरी गुणवत्तेच्या गोटा खोबऱ्याच्या ‘एमएसपी’मध्ये २५० रुपये प्रतिक्विंटलने वाढ करण्यात आली आहे, तर पुढील वर्षासाठी मिलिंग खोबऱ्याच्या समर्थन मूल्यात ३०० रुपये प्रतिक्विंटलने वाढ करण्यात आली आहे.

चालू हंगामात, सरकारने १,४९३ कोटी रुपयांच्या १.३३ लाख टनांहून अधिक खोबऱ्याची विक्रमी खरेदी केली आहे, ज्याचा सुमारे ९०,००० शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. २०२२ च्या तुलनेत चालू सत्रात खरेदी २२७ टक्के जास्त झाली आहे. उच्च एमएसपी केवळ नारळ उत्पादकांना चांगला मोबदला मिळवून देणार नाही तर शेतकऱ्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नारळाच्या उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी खोबऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देईल, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

मिलिंग खोबरे तेल काढण्यासाठी वापरले जाते, तर गोटा (खाण्यायोग्य) खोबरे हे कोरडे फळ म्हणून तसेच धार्मिक कारणांसाठी वापरले जाते. केरळ आणि तामिळनाडू हे खोबऱ्याचे प्रमुख उत्पादक आहेत, तर गोटा खोबऱ्याचे उत्पादन प्रामुख्याने कर्नाटकात होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT