Weather News agrowon
ॲग्रो विशेष

Weather News : राज्यात गारठ्यात काहीशी घट; तापमानाचा पारा वर

Weather Update : राज्यात गारठा कमी होण्याची शक्यता

Team Agrowon

Maharashtra Cold : पुणे : किमान तापमानात वाढ होत असल्याने राज्यात गारठा काहीसा कमी झाला आहे. १० अंशांच्या खाली घसरलेला पारा पुन्हा वर सरकला आहे.

आजपासून (ता. २९) राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. गुरुवारी (ता. २८) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यात तापमानाचा पारा १० अंशांच्या वरच आहे.

आज (ता. २९) राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. गारठाही कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरुवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३१.३ (१२.१), धुळे ३३.० (९.४), जळगाव २९.९ (१३.९), कोल्हापूर - (१७.२), महाबळेश्वर २६.२ (१४.६), नाशिक ३२.३ (१४.१), निफाड ३०.४ (११.२), सांगली ३१.८ (१६.८), सातारा ३२.२ (१३.८), सोलापूर ३२.२(१६.४), सांताक्रूझ ३४.० (१९.८), डहाणू २८.३ (१९.६), रत्नागिरी ३६.३ (२१.६), छत्रपती संभाजीनगर ३०.६ (१३.०),

नांदेड ३०.२ (१६.०), परभणी ३०.१ (१३.८), अकोला ३१.८ (१५.३), अमरावती ३०.६ (१४.९), बुलडाणा ३१.२ (१५.४), ब्रह्मपुरी ३२.५ (१४.२), चंद्रपूर २९.२(१३.०), गडचिरोली ३०.० (१३.०), गोंदिया २८.५ (१२.४), नागपूर २९.६(१४.८), वर्धा २९.५(१५.०), वाशीम ३०.२ (१४.४), यवतमाळ ३०.० (१३.०).

थंड वाऱ्याचे प्रवाह कमी
उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी-अधिक होत असून, गुरुवारी (ता. २८) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भू-भागावरील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंडमध्ये अनेक भागात किमान तापमान ८ ते १२ अंशांच्या दरम्यान होते. उत्तरेकडून महाराष्ट्राकडे येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह काहीसे कमी झाल्याने राज्यात गारठा कमी झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT