Lemon Agrowon
ॲग्रो विशेष

Lemon Rate In Mumbai : तापमानवाढीचा लिंबाला तडाखा

Lemon Market : उन्हाचा कडाका वाढताच लिंबाच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे त्याच्या किमतीही वधारल्या आहेत.

Team Agrowon

Vashi Lemon News : उन्हाचा कडाका वाढताच लिंबाच्या मागणीमध्ये (Lemon Demand) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे त्याच्या किमतीही वधारल्या आहेत.

सद्यस्थितीत एका लिंबाची किंमत सात ते दहा रुपये इतकी झाली असून घरोघरी, हॉटेलमध्ये लिंबाची मागणी वाढल्याने दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

घाऊक आणि किरकोळ बाजारामध्ये लिंबांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ बाजारामध्ये एका लिंबाची विक्री सात ते दहा रुपयांनी केली जात आहे.

मागणीच्या तुलनेत लिंबाचा तुटवडा जाणवत असून सरबत विक्रेते तसेच हॉटेल्समधून मागणी वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. काही हॉटेल्समध्ये लिंबाची फोडदेखील गायब झाली आहे. सरबत विक्रेत्यांनीही लिंबू सरबताची किमतही दोन रुपयांनी वाढली आहे.

आवक पन्नास टक्‍केच

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नगर, सोलापूर, आंध्र प्रदेशातून आवक होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही आवक पन्नास टक्के घटली आहे. त्याचा परिणाम लिंबाच्या दरांवर झाला आहे.

सरबताच्या दरात वाढ

वाढत्या उष्म्यामुळे शीतपेयाची मागणी वाढली आहे. अशातच लिंबाच्या दरांमध्ये वाढ झाल्याने शीतपेयांच्या किमतीमध्येही यंदा वाढ झाली आहे. पूर्वी दहा रुपयाला मिळणारा सरबत उपनगरांमध्ये काही ठिकाणी पंधरा रुपयांना मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT