Kolhapur Market Committee amit shah
ॲग्रो विशेष

Kolhapur Market Committee : कोल्हापूर बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ, गूळ बाजारपेठेचा लौकिक देशभर वाढवण्यावर भर

Kolhapur Onion Market : ‘कांदा, बटाटा बाजाराला चांगल्या सुविधा द्याव्यात. बाजार समितीने चांगल्या सुविधा दिल्या तर आम्ही कांदा व्यापारी बाजार समितीत राहू.’

sandeep Shirguppe

Kolhapur Agricultural Produce Market Committee : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात यंदा वाढ झाली असून, त्यातून २ कोटी ४४ लाखांच्या ठेवी ठेवण्यात आल्या. एकूण १८ कोटी ४३ लाखांच्या ठेवी आहेत. उत्पन्नाचा मेळ घालून बाजार समितीत चांगल्या सुविधा देऊन गूळ बाजारपेठेचा लौकिक देशभर वाढवू, असे आश्वासन शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. प्रकाश देसाई यांनी दिले.

मार्केट यार्डातील मल्टिपर्पज हॉलमध्ये समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत झाली. शेतकरी, धान्य व्यापारी, कांदा, बटाटा बाजार तसेच गूळ व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींनी बाजार समिती आवारात रस्ते, वीज, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, सुरक्षा रक्षक, प्रवेशद्वारांची वाढ करावी आदी सुविधांच्या मागण्या केल्या.

फळ विक्रेत्यांतर्फे प्रसाद वळंजू म्हणाले, ‘फळ बाजारातील आवक सध्या घटत आहे. कोल्हापुरातील काही व्यापारी सांगलीसह अन्य ठिकाणी जाऊन व्यापार करतात. त्यामुळे फळांच्या नगानुसार कर आकारावा. शाहू उद्यान पर्यटकांसाठी खुले करावे. शाहू सांस्कृतिक मंदिराची दुरुस्ती करून विविध कार्यक्रमांसाठी वापर करावा.’

धान्य व्यापारी वैभव सावर्डेकर म्हणाले, ‘धान्य गाड्या नाक्यावर जास्त काळ थांबून राहतात. वेळ वाया जातो. त्यामुळे नाके त्वरित हटवावेत. बाजार समिती सेवकांची संख्या १६० झाली. खर्चाचे प्रमाण ६० टक्क्यांवर गेले. यापुढे सेवकांची संख्या वाढणार नाही याची काळजी घ्यावी. प्लॉटधारकांना प्रॉपर्टी कार्ड द्यावे.’

कांदा व्यापारी मनोहर चूघ म्हणाले, ‘कांदा, बटाटा बाजाराला चांगल्या सुविधा द्याव्यात. बाजार समितीने चांगल्या सुविधा दिल्या तर आम्ही कांदा व्यापारी बाजार समितीत राहू.’ गुळाला साडेसहा हजारांचा भाव मिळावा असा ठराव गूळ उत्पादकाने मांडला. यावेळी संचालक मंडळ उपस्थित होते. सचिव जयवंत पाटील यांनी अहवाल वाचन केले. उपसभापती सोनल पाटील यांनी आभार मानले.

सभापतींनी सांगितलेल्या भविष्यातील योजना

समितीच्या नफा-तोट्याचा विचार करून नाके हालविण्याचा विचार करू

बाजार समिती आवारात सर्व पायाभूत सुविधा टप्प्याटप्प्याने देणार

आवारात सौर ऊर्जा प्रकल्प राबवून वर्षाला दोन कोटींची बचत करणार

बायोगॅस प्रकल्प उभारणार. सुरक्षा रक्षक, सीसीटीव्हीची संख्या वाढवणार

कुस्ती आखाड्यास सुविधा देणार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT