Kolhapur Sugarcane agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Fodder : मालेगावला ऊस बांडीच्या चाऱ्याच्या आवकेत वाढ

Fodder Shortage : गेल्यावर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थितीमुळे हिरवा चाऱ्याची अनेक गावात टंचाई तयार झाली होती. त्यामुळे जनावरांना सुक्या कडब्यावरच वर्ष काढले.

Team Agrowon

Nashik News : गेल्यावर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थितीमुळे हिरवा चाऱ्याची अनेक गावात टंचाई तयार झाली होती. त्यामुळे जनावरांना सुक्या कडब्यावरच वर्ष काढले. यंदा सुरवातीपासूनच पाऊस असल्याने सर्वत्र सिंचनाची सोय झाली आहे.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चारा लागवड केली आहे. तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मालेगाव शहरात रोज ४० टन उसाचा चारा (बांडी) विक्रीला येत आहे. गेल्यावर्षी ४० रुपयाला १० किलोची मिळणारी पेंढी सध्या २० ते ३० रुपयाला मिळत आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड, गंगापूर, वैजापूर तसेच जळगांव जिल्ह्यातील चाळीसगाव या भागातून उसाची बांडी विक्रीस येते. त्यासाठी व्यापारी २२०० ते २३०० रुपये टनाप्रमाणे उसाचा चारा देत आहेत. गेल्यावर्षी हाच चारा ३५०० ते ४००० रुपये टन प्रमाणे मिळत होता. सध्या आवक वाढल्यामुळे चाराच्या दरातही दुप्पटीने घट झाली आहे.\

येथील बाजारात १५ ते २० चारा विक्रेत्यांकडे चारा विक्रीसाठी दिसत आहे. चाऱ्याची आवक असल्याने यंदा मागणीतही काही प्रमाणात घट झाली आहे. येथे एक छोटी पेंढी २ ते ३ रुपयाला विकली जात आहे.

नोव्हेंबर ते मार्चपर्यंत बाजारात उसाचा चाऱ्याची रेलचेल असणार आहे. यंदा उसाचा हंगाम जोरात असल्याने चाराही मोठ्या प्रमाणात येत आहे. उसाच्या चाऱ्याबरोबरच येथे शाळूचा चारा देखील बाजारात मोठ्या प्रमाणात आवक आहे. अनेक शेतकऱ्यांनी हलक्या जमिनीवर शाळूच्या चाऱ्याची लागवड केली आहे. येथे बाराही महिने चाऱ्याला मागणी असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT