Agriculture Drone Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Drone : ‘ड्रोनच्या वापराने पिकांचे उत्पादन वाढवा’

‘पाश्चात्त्य देशांत पीकवाढीसाठी ड्रोन कॅमेऱ्याने पिकांचे आरोग्य तपासण्याचे अद्ययावत तंत्रज्ञान वापरले जाते. हे तंत्रज्ञान आपण आपल्या देशात सर्वप्रथम इस्लामपूरला आणले आहे.

Team Agrowon

Islampur News : ‘पाश्चात्त्य देशांत पीकवाढीसाठी ड्रोन कॅमेऱ्याने पिकांचे आरोग्य तपासण्याचे अद्ययावत तंत्रज्ञान वापरले जाते. हे तंत्रज्ञान आपण आपल्या देशात सर्वप्रथम इस्लामपूरला आणले आहे.

या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी पिकांचे उत्पादन वाढवावे,’ असे आवाहन राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केले.

येथील मंडले वस्तीशेजारील धीरज विलासराव पाटील यांच्या आठ एकर ऊस पिकावर मल्टिस्पेक्ट्रम ड्रोन कॅमेऱ्याने फोटो काढण्याचा प्रारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

त्या वेळी ते बोलत होते. संचालक शैलेश पाटील, हणमंत माळी, राजकुमार कांबळे, प्रा. डॉ. योजना शिंदे, शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस विकास अधिकारी सुजय पाटील उपस्थित होते.

प्रतीक पाटील म्हणाले, की या तंत्रात अगोदर ड्रोन कॅमेऱ्याने पिकांचे फोटो काढले जातात, त्यानंतर त्यांचे पृथ्थकरण केले जाते आणि त्यातून आपणास पिकातील रोग, किड, अन्नद्रव्याची कमतरता व तणांचा प्रादुर्भाव आदी अचूक माहिती मिळते.

त्यावर आपण नेमकी उपाययोजना करून निश्चितपणे उत्पादन वाढवू शकतो. आम्ही २५-३० शेतकऱ्यांच्या १०० एकरांवर याचा वापर केला आहे. यातील एका क्षेत्रास लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला होता. आठ दिवसांत त्यावर उपाय झाला नसता, तर नुकसान झाले असते.

मात्र, या तंत्राने लोकरी मावा कळला, त्यावर उपाय केला आणि नुकसान टळले. प्रशांत पाटील, सुजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी संजय पाटील, रमेश जाधव या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली.

आता माणसांप्रमाणे पिकांची आरोग्य तपासणी

विविध तपासण्या करून एखाद्या व्यक्तीचे आरोग्य कसे आहे, हे डॉक्टर सांगतात. मात्र, आता पिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. पिकांचे आरोग्य समजून घेण्याचे पाश्चात्त्य देशातील तंत्रज्ञान आपल्या देशात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT