Midday Meal Agrowon
ॲग्रो विशेष

Orange In Midday Meal : शालेय पोषण आहारात संत्र्याचा समावेश करा

Orange Market : राज्यात असलेल्या दिड लाख हेक्‍टरपैकी सर्वधिक एक लाख हेक्‍टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील मोर्शी व वरुड तालुके त्यामुळेच विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जातात.

Team Agrowon

Amaravati News : बांगलादेशने आयात शुल्कात केलेल्या वाढीमुळे देशांतर्गंत बाजारात संत्रा दर घसरले आहेत. ही बाब लक्षात घेता शालेय पोषण आहारात संत्र्याचा समावेश करून संत्रा विक्रीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

राज्यात असलेल्या दिड लाख हेक्‍टरपैकी सर्वधिक एक लाख हेक्‍टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील मोर्शी व वरुड तालुके त्यामुळेच विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जातात. उत्पादित संत्र्यावर ग्रेडिंग, कोटिंगची प्रक्रिया होत त्याची निर्यात बांग्लादेशला करण्यावर व्यापाऱ्यांचा भर आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशने आयात शुल्कात सातत्याने वाढीचे धोरण अवलंबिले आहे.

आता प्रती किलो ८८ रुपये इतके आयात शुल्क आकारले जात आहे. त्याचा थेट निर्यातीवर परिणाम झाला आहे. निर्यात प्रभावीत झाल्याने देशांतर्गंत बाजारात संत्र्याचे दर गडगडले. ही बाब लक्षात घेता शासनाने शालेश पोषण आहारात संत्रा फळांचा समावेश करून या फळाच्या खरेदीसाठी पुढाकार घ्यावा.

शालेय पोषण आहार, महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी व स्तनदा माता यांना मिळणाऱ्या आहारात या फळांचा समावेश व्हावा. त्याकरिताची खरेदी शेतकरी समूह, शेतकरी कंपन्या यांच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसचे मोर्शी तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी केली आहे.

निर्यातक्षम संत्रा उत्पादनासाठी मोर्शी तालुक्‍यात संशोधन केंद्र उभारावे, वादळवाऱ्यासह गारपीट व पावसाने नुकसान झालेल्या संत्रा उत्पादकांना भरपाई मिळावी, तालुक्‍यात माती, पाणी व रासायनीक खताच्या परीक्षणासाठी अद्ययात प्रयोगशाळा उभारावी, पॅक हाऊस व शीतगृह उभारणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा, शेतरस्त्याची दुरुस्ती, अशा मागण्यांही त्यांनी केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT