Chana Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Wilt Disease : हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

Chana Crop : फेइंजल चक्रीवादळाच्या प्रभावाने बदलत्या वातावरणात हरभरावर कीड व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

Team Agrowon

Latur News : फेइंजल चक्रीवादळाच्या प्रभावाने बदलत्या वातावरणात हरभरावर कीड व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यातील देवणी तालुक्यात रब्बी हंगामातील सर्वाधीक पिकक्षेत्र धोक्यात आले आहे.

सलग तिसऱ्या वर्षात रोगाचे संकट आल्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या फवारणीला वेग दिला असून, रोगामुळे उत्पादनात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे. हरभरा रब्बी हंगामातील मुख्य पीक. सोयाबीन तुरीनंतर सर्वाधिक क्षेत्र व चांगला बाजारभाव मिळवून देणारे पीक.

पेरणीपासून काढणीपर्यंतची सुलभ प्रक्रिया, कमी पाण्यावर येणारे पीक, जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी पोषक, कीड-रोगाचा कमी प्रादुर्भाव म्हणून हरभरा पिकाला सर्वाधिक शेतकरी पसंती देतात.

समाधानकारक बाजारभाव राहत असल्याने शेतकरी हरभरा पिकाला प्राधान्य देत आहेत. मात्र चालू हंगामात सर्वाधीक क्षेत्र असलेल्या हरभऱ्याला मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून उत्पादनात मोठी घट येण्याची स्थिती आहे.

या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बी क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, देवणी तालुक्यात १३ हजार ९१४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात नऊ हजार ८९८ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली असून, १२५ हेक्टर गहू, तर एक हजार ४९४ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे.

उसाच्या क्षेत्रातही झपाट्याने वाढ होत असून, उसात आंतरपीक म्हणूनही हरभऱ्याची लागवड होत आहे. खरीप हंगामात जमिनीत असलेला सततचा ओलावा, तणनाशकांची वाढती फवारणी, पीक फेरपालटचा अभाव, शेणखताअभावी जमिनीतील सूक्ष्मअन्नद्रव्याचे घटत चाललेले प्रमाण, रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीची घटत चाललेली सुपीकता यामुळे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT