Malegaon APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Malegaon APMC : शेतमाल खरेदी-विक्री केंद्राचे उद्‌घाटन

Agriculture News Nashik : मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सौंदाणे (ता. मालेगाव) येथे बाजार समिती अंतर्गत शेतमाल खरेदी विक्री केंद्राचा प्रारंभ करण्यात आला.

Team Agrowon

Nashik News : मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सौंदाणे (ता. मालेगाव) येथे बाजार समिती अंतर्गत शेतमाल खरेदी विक्री केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी प्रतिसाद दिला. ५०० हून अधिक वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता.

शुक्रवारी (ता. १) रोजी मालेगांव बाजार समितीच्या अंतर्गत सुरू झालेल्या खरेदी विक्री केंद्राची उ‌द्‌घाटन महंत अर्जुनदास महाराज यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सौंदाणे गावचे सरपंच चेतन पवार होते.

प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे माजी सभापती काशिनाथ पवार, जवानसिंग मोरकर, पवन ठाकरे, संजय निकम, माजी संचालक गोरख पवार, किशोर पवार, सुनील पवार, पोपटराव पवार, भाऊसाहेब पवार, नामदेव पवार, रामचंद्र पवार, बाळू वाणी, विकी खैरनार आदी उपस्थित होते.

समितीचे सभापती अद्वय हिरे यांच्या मार्गदर्शनाने सौंदाणे शेतमाल केंद्रावर शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पहिल्या दिवसापासून शेतकरी, व्यापाऱ्यांना संगणकीकृत पावती उपलब्ध होणार आहे. पहिल्याच दिवशी ५०० वाहनांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला ही आनंदाची बाब आहे.

व्यापाऱ्यांनी बाजारभाव योग्यरीत्या काढीत रोख पेमेंट करण्याचा पायंडा पाडला हे स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. उपसभापती विनोद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. पवन ठाकरे यांनी संचालक मंडळाने निवडणूक काळात दिलेल्या शब्दाची आश्वासनपूर्ती केल्याचे सांगितले.

यावेळी बाजार समितीचे संचालक रवींद्र मोरे, नंदलाल शिरोळे, डॉ. उज्जैन इंगळे, संदीप पवार, सुभाष सूर्यवंशी, राजेंद्र पवार, मिनाक्षी देवरे, चंद्रकांत शेवाळे, विनोद बोरसे, रत्ना पगार, अरुणा सोनजकर, रवींद्र निकम, भिका कोतकर, रवींद्र साळुंके, सचिव कमलेश पाटील, गोरस खैरनार, नथु खैरनार, जालिंदर शेलार, दिगंबर पगार, माधव पवार, सोमनाथ अहिरराव, लक्ष्मण पवार, अक्षय पवार, प्रवीण छाजेड, सुशील पलोड, प्रज्वल अभोणकर, योगेश पवार आदी उपस्थित होते. रवींद्र सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT