Silk Industry Shed Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Industry : पांगरी शिवारातील वादळात रेशीम शेड झाले आडवे

Silk Production Business : परळी वैजनाथ तालुक्यातील पांगरी शिवारात तीन दिवसांपूर्वी आलेल्या वादळात पांगरी येथीलच बाबूराव खेत्रे यांच्या शेतातील रेशीम उद्योगाचे शेड जमीनदोस्त झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Beed News : परळी वैजनाथ तालुक्यातील पांगरी शिवारात तीन दिवसांपूर्वी आलेल्या वादळात पांगरी येथीलच बाबूराव खेत्रे यांच्या शेतातील रेशीम उद्योगाचे शेड जमीनदोस्त झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

यासंदर्भात अधिक माहितीनुसार, श्री. खेत्रे २००७ पासून रेशीम उद्योग करतात. आधी साध्या शेडमध्ये सुरू असलेला रेशीम उद्योग २००९ मध्ये त्यांनी ४० बाय २० फूट आकाराच्या पक्क्या शेडमध्ये सुरू केला होता.

गत काही दिवसांपासून मराठवाड्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवकाळीच्या संकटादरम्यान गुरुवारी (ता. २०) सायंकाळी पांगरी शिवारात जोरदार वादळ आले. या वादळात बाबूराव खेत्रे यांच्या रेशीम उद्योगाचा आधार असलेले शेड जमीनदोस्त झाले.

शेड उभारणी वेळी त्यांना जवळपास एक ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. आता एवढेच शेड उभी करायच झाल्यास जवळपास दोन ते सव्वा दोन लाख रुपये खर्च येईल, असे श्री. खेत्रे म्हणाले.

नैसर्गिक आपत्ती झालेल्या नुकसानीची माहिती समाज माध्यमाचा वापर करून श्री. खेत्रे यांनी तलाठी यांच्यापर्यंत पोहोचविली. यासंदर्भात आता आपण तहसील कार्यालय व रेशीम विभागाला निवेदन देणार असल्याचेही श्री.खेत्रे यांनी सांगितले. शासनाने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी ही शेतकऱ्याकडून केली जाते आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: राज्यात पावसाला पोषक हवामान

Soybean Seeds Fraud: पश्‍चिम विदर्भात सोयाबीन बियाण्यांचा ‘फसवा खेळ’!

Soybean Price: सोयाबीनची झेप हमीभावापुढे; दर सात हजारांवर!

Farmers Income Growth: निर्यातीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ

Bamboo Plantation Campaign: एक लाख बांबू लागवड मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ

SCROLL FOR NEXT