APMC Elections Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Apmc Election Update : सांगली बाजार समिती निवडणुकीत माजींची पणन संचालकांकडे धाव

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठीच्या अर्ज छाननीत माजी सभापती संचालकांसह दिग्गज उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवल्याने माजी संचालकांनी पणन संचालकांकडे धाव घेतली आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठीच्या (Sangli Agriculture Produce Market Committee Election) अर्ज छाननीत माजी सभापती संचालकांसह दिग्गज उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवल्याने माजी संचालकांनी पणन संचालकांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे पणन संचालक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, असे असतानाही राजकीय पक्षांची भूमिका अद्याप गुलदस्तात आहे.

बाजार समितीच्या १८ जागांसाठी विक्रमी ५९८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. ५) अर्जांची छाननी झाली.

या वेळी अनिल शेगुणसे यांनी बाजार समितीच्या माजी नऊ संचालकांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. माजी संचालक वसंतराव गायकवाड यांनी शेगुणसे शेतकरी नाहीत, त्यांच्या नावावर जमीन नसल्याने त्यांचा अर्ज अपात्र ठरवण्याची मागणी केली त्यामुळे हरकतींवरील सुनावणी झाली.

परंतु निर्णय राखून ठेवला होता. गुरुवारी (ता. ६) दोन्हीकडील बाजू जाणून घेऊन सुरवसे यांनी माजी संचालकांचे अर्ज अवैध ठरवले. त्यामुळे या उमेदवारांना धक्का बसला आहे.

दरम्यान, निवडणुकीत माजी संचालकांच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेप घेणारे अनिल शेगुणसे यांचाही अर्ज छाननीत अवैध ठरवला आहे. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तलाठ्यांमार्फत पडताळणी करून शेणुणसे यांच्या शेती मालकीची खात्री केली.

संबंधित तलाठ्याने नजरचुकीने शेतकरी असल्याचा दाखला दिल्याचा लेखी खुलासा सादर केला. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला. माजी संचालकांचे अर्ज अवैध ठरल्याने त्यांनी पणन संचालकांच्याकडे धाव घेतली.

मात्र, यामध्ये अद्याप कोणत्याही राजकीय नेत्याने उडी घेतली नाही. त्यामुळे पणन संचालकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाजार समितीत राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) यांची पॅनेलबाबत भूमिका अद्याप गुलदस्तात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT