Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Subsidy : खरिपाच्या तोंडावर आता कांदा अनुदान तातडीने द्या

Unseasonal Rain : मार्च व एप्रिल महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर लवकरात लवकर मदतीची रक्कम वर्ग केली जाणार असल्याचे महसूल व पुनर्वसन विभागाने कळविले आहे.

Team Agrowon

Nashik Onion News : मार्च व एप्रिल महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर लवकरात लवकर मदतीची रक्कम वर्ग केली जाणार असल्याचे महसूल व पुनर्वसन विभागाने कळविले आहे.

आता ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी सुरू झाली आहे. मात्र या मदतीसह खरीप हंगामाच्या तयारीसाठी कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान तत्काळ द्यावे, अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

चव्हाण म्हणाल्या, की नाशिक विभागात मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमध्ये बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. कांदा, मिरची, टोमॅटोसह भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते.

फोटो व व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून या नुकसानीची तीव्रता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच कृषी व महसूलमंत्री यांच्या कार्यालयाकडे कळविताच अयोध्या दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बागलाणचा दौरा केला.

करंजाड, पारनेर, निताने, बिजोटे व आखतवाडे येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना लवकर मदत देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, दोन महिने होऊनही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नसल्याने शासनाच्या विरोधात असंतोष वाढत होता.

त्यामुळे ५ जूनपर्यंत मदत जाहीर झाली नाही तर मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण करण्याचा इशारा देताच शासकीय यंत्रणा जागी झाली. मात्र आता कांद्याला जाहीर केलेले प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदानही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे आश्वासन दिले होते.

आता उत्पादकांच्या प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palkhi Route Incomplete: पालखी आठ दिवसांवर, तरीही तयारी अपुरीच

Pune Heavy Rain: मुसळधार पावसाने झोडपले; धरणांतून विसर्ग

Legislature Adjourned: विधिमंडळाचे कामकाज काही मिनिटांतच तहकूब

Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

Maharashtra Agriculture Sowing: राज्यात ३९ टक्के पेरण्या पूर्ण

SCROLL FOR NEXT