ॲग्रो विशेष

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

८ वाजून ४० मिनिटापर्यंतच्या कलानुसार २८८ पैकी २२२ मतदारसंघांचे कल समोर आले आहेत. यामध्ये महायुतीने १२० तर महाविकास आघाडीने ९६ जागांवर आघाडी घेतली आहे.

Dhananjay Sanap

अवघ्या देशाचं लक्ष असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरूवात झाली. पहिल्या अर्ध्या तासातील पोस्टल मतमोजणीच्या कलानुसार राज्यात महायुतीचं पारडं जड दिसतंय. तर महाविकास आघाडी पिछाडीवर आहेत. ८ वाजून ४० मिनिटापर्यंतच्या कलानुसार २८८ पैकी २२२ मतदारसंघांचे कल समोर आले आहेत. यामध्ये महायुतीने १२० तर महाविकास आघाडीने ९६ जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच इतरने ६ जागेवर आघाडी घेतली आहे. मात्र अजूनही ६६ जागांवरील कल समोर येणे बाकी आहे.

राज्यात २० नोव्हेंबर रोजी २८८ जागांसाठी मतदान झाले. तर आज म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी निकाल येणार आहे. यंदा मतदानाचा टक्काही वाढला आहे. २०१९ च्या तुलनेत ५ टक्के अधिक मतदान झाले. त्यामुळे राज्यातील एकूण मतदानाची टक्केवारी ६६ टक्क्यांवर पोहचली.

महायुती आणि महाआघाडीमध्ये निवडणुकी चुरशी होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT