Lumpy Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Disease : सातारा जिल्ह्यात ‘लम्‍पी’ने पुन्‍हा १०७६ जनावरे बाधित

Lumpy Skin Disease : ‘लम्पी स्कीन’ आजाराचा सर्वाधिक फटका कोरेगाव, सातारा तालुक्यांना बसला असून, गेल्या दोन महिन्यांत जिल्हाभरात १०७६ जनावरे बाधित असून यापैकी ४२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

Team Agrowon

Satara News : जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी स्कीन’ या संसर्गजन्‍य आजाराने पुन्हा डोकेवर काढले आहे. या आजाराचा सर्वाधिक फटका कोरेगाव, सातारा तालुक्यांना बसला असून, गेल्या दोन महिन्यांत जिल्हाभरात १०७६ जनावरे बाधित असून यापैकी ४२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्‍या पशुसंवर्धन विभागाद्वारे प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी राज्यभरात लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभाग लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झाले, तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतही दिली होती.

जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात लम्पीने बाधित जनावरांची संख्या एक हजार ७६ वर गेली आहे. माण आणि वाई तालुका वगळता जिल्ह्यात आतापर्यंत ४२ जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला आहे.

तर आतापर्यंत मृत्‍यू झालेल्‍या जनावरांची संख्‍या अशी : सातारा तालुक्यात सात, कोरेगाव तालुक्यात १३, खंडाळा तालुक्यात आठ, खटाव तालुक्यात तीन, महाबळेश्वर तालुक्यात दोन, जावळी तालुक्यात आठ आणि पाटण तालुक्यातील एका जनावराचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यातील स्‍थिती

लम्‍पी बाधित जनावरे एक हजार ७६

सद्यःस्थितीत उपचारार्थ जनावरे ११७

लम्पीतून बरे झालेले जनावरे ९१९

आतापर्यंत मृत जनावरे ४२

‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. जनावरांच्या गोठ्यात गोमाशा, डास यांचा शिरकाव होऊ नये याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. लम्पीला रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी जंतुनाशक फवारणीही करण्यात येत आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता लम्पीसदृश लक्षणे दिसल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.
डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT