Chhatrapati Sambhajinagar News : आधी झालेला रिमझिम पाऊस व त्यानंतर गत दोन दिवसात अपवाद वगळता बहुतांश भागात पावसाने मध्यम ते दमदार लावलेली हजेरी यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीने गती पकडली आहे. पुढे सरी पाडणे आणि मागे लागवड अशी पेरणीची घाई बुधवारी (ता. २८) जिल्ह्यातील अनेक शेतांमध्ये दिसून आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी ६ लाख ७५ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.
प्रस्तावित करण्यात आलेल्या पीक पेरणीमध्ये कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक ३ लाख ८२ हजार हेक्टर राहण्याचा अंदाज असून मका व बाजरी या पिकाचे अनुक्रमे १ लाख ७४ हजार हेक्टर व २२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे.
जिल्ह्यात बियाण्याचा सरासरी वापर ३४,४८२ इतका आहे. येत्या खरीप हंगामासाठी ३९ हजार १०३ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. १९ लाख कपाशी बियाणे पाकीट मागणी आहे.
२१ जून पर्यंत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कपाशीच्या तीन लाख ९४ हजार ७७१ हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी ३८१९ हेक्टर वर कपाशीची लागवड झाली होती.
२१ जून पूर्वी छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ६५० हेक्टर वर पैठण तालुक्यात १७२० हेक्टर वर गंगापूर तालुक्यात ५९ हेक्टर वर वैजापूर तालुक्यात पण चव्हाण हेक्टरवर सिल्लोड तालुक्यातील ३० हेक्टर वर कन्नड तालुक्यात २८ हेक्टर वर तर सोयगाव तालुक्यातील १ हजार ५४३ हेक्टर वर खरिपाची पेरणी झाली होती.
त्यावेळी अपेक्षित पावसाच्या तुलनेत १६ टक्केच पाऊस झाला होता सोबतच लागवड झालेल्या कपाशी पिकावर कुठलाही कीड रोग आढळून आला नव्हता असे कृषी विभागाने कळविले होते.
गत दोन दिवसात झालेल्या हलक्या मध्यम ते दमदार पावसामुळे कपाशीच्या लागवडीने गती पकडली आहे. शिवाय आता पाऊस येईल या आशेने शेतकऱ्यांनी इतर खरीप पिकांच्या पेरणीलाही सुरवात केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.