Parbhani Agriculture College Agrowon
ॲग्रो विशेष

Parbhani Agriculture College : कृषी विभागात परभणी कृषी महाविद्यालचा ठसा

Agriculture College News : परभणी कृषी महाविद्यालयातील पदवीधरांनी कृषी विभाग तसेच प्रशासनात आपल्या कार्याचा ठास उमटवला आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी कृषी महाविद्यालयातील पदवीधरांनी कृषी विभाग तसेच प्रशासनात आपल्या कार्याचा ठास उमटवला आहे. माजी विद्यार्थ्‍यांना महाविद्यालयातील शिक्षकांप्रती आदराची भावना कायम आहे. महाविद्यालयीन मित्रांमध्‍ये अतूट नाते आहे. ही संस्‍कृती जपावी लागणार आहे. या महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.

वस्तीगृहांमधील वास्तव्यात समस्‍यांना तोंड देतांना विद्यार्थ्यांची जडण-घडण होते, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी तथा कृषी आयुक्‍त सुनील चव्‍हाण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या माजी विद्यार्थ्‍यांचा स्‍नेहमेळावा व ग्रीष्‍म वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांनी नूतनीकरण केलेल्‍या खोलीचे लोकार्पण कार्यक्रम मंगळवारी (ता. ९) आयोजित करण्यात आला होता.

यावेळी अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी होते. माजी विद्यार्थी तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य आमदार सुरेश वरपुडकर याची उद्घाटक म्हणून उपस्थिती होते.

विशेष सत्कारमूर्ती महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा कृषी आयुक्‍त सुनील चव्‍हाण, श्रीमती चव्‍हाण, नाशिकचे पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, रामभाऊ घाटगे, डॉ. सोंडगे, आयोजक प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, कृषी विद्यापीठ पदवीधर संघाचे अध्‍यक्ष अॅड अनंत चोंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राज्‍यातील विविध पदावर कार्यरत अधिकारी, लोकप्रतिनिधी, उद्योजक यांचा शाल, स्‍मृतीचिन्‍ह देऊन विशेष सत्‍कार करण्‍यात आला.

ग्रीष्‍म वसतिगृहातील खोली क्रमांक ४२ मध्‍ये वास्‍तव्‍यास असणारे सन १९९२ च्या बॅचचे कृषी पदवी अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य अॅड. अनंत चोंदे यांनी स्वखर्चातून खोलीचे नूतनीकरण केले या खोलीचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते लोकार्पण करण्‍यात आले.

डॉ. इंद्र मणी म्‍हणाले, की परभणी कृषी विद्यापीठाचे अनेक कृषी पदवीधर देशात व राज्‍यात विविध पदावर कार्य करत आहेत. त्यात महाविद्यालयातील शिक्षकांचे मोठे योगदान आहे. त्‍यांचे ऋुण कधीही विसरू नयेत. शेतकरी व विद्यार्थी हेच कृषी विद्यापीठाच्‍या कार्याचे हे केंद्रबिंदू आहेत. वरपुडकर म्‍हणाले, की परभणी कृषी विद्यापीठाची स्‍थापना मोठ्या संघर्षातून झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

Festival Noise Pollution: गोंगाटात हरवलेला उत्सव

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

SCROLL FOR NEXT