Maharashtra Drought Condition agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : अकोला जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीतील सवलती लागू

Akola Drought Update : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या ५१ मंडलांची यादी यापूर्वीच जाहीर झाली असून उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीत लागू सवलतीबाबतचा आदेश मंगळवारी (ता.२८) जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केला आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या ५१ मंडलांची यादी यापूर्वीच जाहीर झाली असून उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

आदेश जारी झाल्याने आणि उपाय योजनांबाबतचा तपशीलही स्पष्ट करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलतींचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्ज वसुलीला स्थगिती, वीजबिलात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांचे शुल्क माफ सवलतींचा समावेश आहे.

जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यात फारसा पाऊस झाला न झाल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र जुलै महिन्यातील १९, २२ व २३ तारखांना अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. नंतरच्या काळात २१ दिवसांपेक्षा जादा दिवस पावसाचा खंडही पडला. परिणामी पिकांचे उत्पादन घटले.

राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे दुष्काळ जाहीर झाला होता. काही मंडलांमध्ये असलेली पावसाची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील ५२ पैकी ५१ महसूल मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली होती.

दुष्काळ जाहीर झाल्याने अनेक सवलती मिळणार असून उपाय योजनांची अंमलबाजवणी सुरू झाली आहे. यात जमीन महसुलात घट, सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती संबंधित मंडलांमध्ये लागू झाल्या आहेत.

तालुकानिहाय मंडले

अकोट : अकोट, मुंडगाव, पणज, चोहोट्टा बाजार, कुटासा, आसेगाव बाजार, उमरा, अकोलखेड

तेल्हारा : तेल्हारा, हिवरखेड, अडगाव बुद्रूक, माळेगाव बाजार, पाथर्डी, पंचगव्हाण

बाळापूर : बाळापूर, पारस, व्याळा, वाडेगाव, उरळ बुद्रूक, निंबा, हातरूण

पातूर : पातूर, बाभूळगाव, आलेगाव, चान्नी, सस्ती

अकोला ः अकोला, घुसर, दहिहंडा, कापशी, उगवा, आगर, बोरगाव मंजू, शिवणी, पळसो बुद्रूक, सांगळूद, कुरणखेड.

बार्शीटाकळी : बार्शीटाकाळी, राजंदा, धाबा, पिंजर, खेर्डा बुद्रूक, महान

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर, हातगाव, निंबा, माना, शेलू बाजार, लाखपुरी, कुरुम, जामठी, माळेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT