Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : दुष्काळग्रस्त तालुक्यातील सवलती तत्काळ अंमलात आणा

Drought Update : शिराळा, कडेगाव, खानापूर-विटा, मिरज या चार तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून शासनाने मंजूर केलेल्या सवलती लागू केल्या.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर-विटा, मिरज या चार तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून शासनाने मंजूर केलेल्या सवलती लागू केल्या.

तसेच १० नोव्हेंबरच्या शासन निर्णयान्वये कवठेमहांकाळ, वाळवा, जत, तासगाव, पलूस व आटपाडी या तालुक्यांमधील ३७ महसूल मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केली आहे. शासनाने मंजूर केलेल्या सवलती प्रशासकीय विभागांनी त्वरित अंमलात आणाव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

आदेशात म्हटले आहे, की जमीन महसुलात सुट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट दिली आहे. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले.

रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणली. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे या सवलती लागू केल्या आहेत. त्या अंमलात आणाव्यात.

जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेली तालुकानिहाय ३७ महसूल मंडले

तालुका मंडलांची संख्या मंडलांची नावे

कवठेमहांकाळ ५ ढालगाव, देशिंग, कुची, कवठेमहांकाळ, हिंगणगाव.

वाळवा ११ वाळवा, कोरेगाव, कुरळप, तांदुळवाडी, ताकारी, पेठ, कासेगाव, बहे, आष्टा, इस्लामपूर, कामेरी.

जत ८ संख, माडग्याळ, जत, मुचंडी, डफळापूर, कुंभारी, उमदी, शेगाव.

तासगाव ६ मांजर्डे, विसापूर, येळावी, मणेराजुरी, सावळज, तासगाव.

पलूस ४ कुंडल, पलूस, भिलवडी, अंकलखोप.

आटपाडी ३ दिघंची, खरसुंडी, आटपाडी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT