Urea Agrowon
ॲग्रो विशेष

Urea Stock Seized : कडेगावला ३७ लाख रुपयांचा बेकायदा युरियाचा साठा जप्त

Illegal Stock of Urea : कडेगाव एमआयडीसी येथे कृषी विभागाने केलेल्या कारवाईत ३७ लाख ८९ हजार ७७९ रुपयांचा जवळपास २१० टन संशयित बेकायदेशीर युरियाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Team Agrowon

Sangli News : कडेगाव एमआयडीसी येथे कृषी विभागाने केलेल्या कारवाईत ३७ लाख ८९ हजार ७७९ रुपयांचा जवळपास २१० टन संशयित बेकायदेशीर युरियाचा साठा जप्त करण्यात आला आहे. कडेगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल सुकुमार बिरनाळे यांनी फिर्याद दिली आहे. 

गोदाम मॅनेजर शंकर जगन्नाथ काळे (वय ५३, रा.आटके ता.कराड जि.सातारा) याचे विरुद्ध कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.  याबाबत पंचायत समिती कडेगाव व कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,कडेगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा खत नियंत्रण निरीक्षक राहुल सुकुमार बिरनाळे व खत नियंत्रण निरीक्षक तथा कडेगाव तालुका कृषी अधिकारी  बुकेश्वर प्रकाश घोडगे व कडेगावचे पोलिस उपनिरीक्षक  यू. आर. काळे यांनी  कडेगाव एमआयडीसीमधील प्लॉट नं.ए ३८ मधील गोदामात  तपासणी केली.

गोदामात कृषी वापराच्या युरियाच्या ४५  किलोच्या २ हजार ७२९ बॅगा आढळल्या. यावेळी  औद्योगिक वापराच्या बॅगमध्ये  युरिया असलेल्या ५० किलोच्या एक हजार ३५० बॅगा आढळून आल्या. या वेळी  गोदामाच्या समोर उभा असणाऱ्या  ट्रक (एमएच ०४ जीआर ३००४)  मध्ये ५० किलोच्या  ४०० बॅगा आढळून आल्या.

हा ट्रक युरियाच्या  बॅगा भरून  वाहतुकीसाठी तयार असल्याचे दिसून आले. येथील  गोदाम मॅनेजर शंकर जगन्नाथ काळे याने  रासायनिक युरिया खताचे मूळ वेस्टन फोडून तो कारखान्याच्या वापराकरिता देण्यात येणाऱ्या वेस्टनमध्ये भरून शिलाई करून ट्रकमध्ये भरल्याचे आढळून आले. येथे  कृषी व औद्योगिक वापराचा युरिया एकूण ४ हजार ४७९ बॅगांचा साठा आढळला.

औद्योगिक कामासाठी अनधिकृत वापर

गोदामात युरीया खताच्या २ हजार ७४२ रिकाम्या बॅगाही आढळल्या आहेत. युरिया खत शेतीव्यतिरिक्त इतर औद्योगिक कामासाठी मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे वापरले जात असल्याची शक्यता बळावली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT