Bogus Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Seed : बोगस बियाणे रोखण्यासाठी तपासणी आवश्यक

Illegal Seed : खानदेशात कापूस व अन्य पिकांचे बोगस, बेकायदेशीर बियाणे गुजरात, मध्य प्रदेशातून येते. ही समस्या रोखण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेशातील सीमा, नाक्यांवर तपासणी सुरू करण्याची गरज आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कापूस व अन्य पिकांचे बोगस, बेकायदेशीर बियाणे गुजरात, मध्य प्रदेशातून येते. ही समस्या रोखण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेशातील सीमा, नाक्यांवर तपासणी सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी आतापासून कृषी विभागाने मोहीम सुरू केल्यास शेतकऱ्यांचीही फसवणूक टाळता येईल.

मागील हंगामात उपप्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस व कृषी विभाग यांच्यात समन्वय राखून कार्यवाहीचे आदेश देण्यात आले होते. यंदाही याच धर्तीवर कारवाई केली जावी, अशी मागणी आहे. खरीप हंगामात बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये, यासाठी जिल्ह्यात भरारी पथके तयार करण्याची गरज आहे.

मागील वेळेस मे महिन्यातच १६ भरारी पथके कार्यरत झाली होती. हंगाम जूनमध्ये सुरू होतो, पण अवैध कापूस बियाणे याच महिन्यात दाखल होते. हे बियाणे, मध्य प्रदेश, गुजरातमधून येतात. कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. पण त्यास अंतिम स्वरूप आलेले नाही. अंतिम कृती कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय एक व तालुकास्तरीय पथकांची गरज आहे. खरीप हंगामापूर्वी म्हणजेच एप्रिल अखेर व मे मध्ये व हंगाम सुरू झाल्यानंतर खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होते.

या कालावधीत फसवणूक होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, बियाणे पाकिटाचा टॅग व लॉट नंबर शेतकऱ्यांनी पडताळून पाहावा, तसेच बियाणे पाकिटे पीक निघेपर्यंत जपून ठेवावे. अनधिकृत/विनाबिलाने बियाणे खरेदी करू नये. कीटकनाशक, तणनाशके आदी खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी यासंबंधी जनजागृतीची गरज आहे, असे मत कृषिकेंद्रचालक व्यक्त करीत आहेत.

कापूस पीक अधिक, अवैध प्रकारही अधिक

खानदेशात कापसाची लागवड अधिक असते. ही लागवड अधिक राहत असल्याने अवैध बियाणे पुरवठादार आपली कमाई करून घेण्याच्या प्रयत्नात असतात. यंदा कापूस लागवड कमी होणार आहे. पण जळगाव जिल्ह्यात किमान साडेचार लाख हेक्टरवर कापूस पीक राहील. अन्य पिकांच्या तुलनेत ही लागवड अधिक राहणार आहे. अवैध कापूस बियाणे दरवर्षी खानदेशात दाखल होते, ते थांबविण्यासाठी मोहीम आतापासून सुरू करण्याचा मुद्दा कृषिकेंद्रचालक, शेतकरी आदी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT