Cotton Seeds Seized Nashik agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seeds Seized Nashik : नाशिक जिल्ह्यात अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Cotton Seeds Seized Nashik : फसवणूक व नुकसान टाळण्यासाठी अवैध एचटीबीटी बियाणे खरेदी टाळावी यासाठी कृषी विभागाने जनजागृती करत आवाहन केले होते.

Team Agrowon

Nashik Cotton Seeeds : नाशिक विभागात जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात बंदी असूनही अवैधरित्या ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यांची लागवडीसाठी विक्री केली जाते. या पार्श्‍वभूमीवर गुण नियंत्रण विभागाने सावध होत जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांत आतापर्यंत ४ ठिकाणी कारवाई केली आहे. यात ३४ लाख किमतीची २,२९३ बियाणे पाकिटे जप्त करण्यात आल्याची माहिती नाशिक विभागाचे गुणवत्ता नियंत्रण तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर यांनी दिली.

फसवणूक व नुकसान टाळण्यासाठी अवैध एचटीबीटी बियाणे खरेदी टाळावी यासाठी कृषी विभागाने जनजागृती करत आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर या बियाणे विक्री–पुरवठ्यावर गुणनियंत्रण विभागाची नजर होती. मंगळवारी (ता. २०) नंदुरबार व शिरपूर येथे नाशिक विभागस्तरीय पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेस सापळा रचून डमी ग्राहक पाठवून अनधिकृत एचटीबिटी कापूस बियाणे विक्री करणाऱ्या व्यक्तींवर २ गुन्हे दाखल केले आहेत. नंदुरबार आणि शिरपूर शहरात एकाच दिवशी कारवाई झाली.

सापळा रचून नंदुरबार व शिरपूर शहरात या दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी साधारणपणे ११ ते १२ च्या दरम्यान सापळा रचून बेकायदा व अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करणाऱ्या व्यक्तींविरोधात २ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

एकाच दिवशी दोन जिल्ह्यांत झालेल्या या कारवाईमुळे एचटीबीटी कापूस या अवैध बियाणे विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या वेळी नंदुरबार येथे अनिल ओंकार शिंदे (वय ३८) यांच्याकडून १.५० लाख किमतीची ९१ पाकिटे तर शिरपूर येथे सूर्यकांत गुजर (भरवाडे, ता. शिरपूर) यांना ताब्यात घेण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT