Fake Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fake Fertilizer : धाराशिव जिल्ह्यात अवैध खत साठा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

Dharashiv District News: जप्त केलेल्या अवैध खत साठ्याची किंमत ४ लाख ६१ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणात वाशी पोलिसांनी विकास होळे आणि दत्ता लिंबराज तावरे यांच्या गुन्हा दाखल केला आहे.

Dhananjay Sanap

Fertilizer News : राज्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा मारून अवैध खत साठा जप्त करण्यास सुरुवात केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील पिंपळगाव लिंगी (ता.वाशी) येथील पोल्ट्री शेडमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा मारला. या छाप्यात २० टन खतांचा अवैध साठा जप्त केला आहे.

जप्त केलेल्या अवैध खत साठ्याची किंमत ४ लाख ६१ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणात वाशी पोलिसांनी विकास होळे आणि दत्ता लिंबराज तावरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

प्राथमिक चौकशीत तावरे यांनी खामकरवाडी येथील त्यांचे नातेवाईक विकास होळे यांच्या आणल्याचं सांगितलं आहे. यासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांनी विकास होळे यांची चौकशी केली. होळे यांनी उत्तरात आपण दवाखान्यात असून उद्या पावती आणून देतो असं सांगितलं आहे. परंतु दोघांच्या चौकशीमध्ये समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची निविष्ठा खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु बनावट आणि बोगस कृषी निविष्ठामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते. त्यामुळे राज्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून छापा मारून कारवाई सुरू आहे.

माहिती कशी मिळाली?

धाराशिवचे कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांना अवैध खत साठ्याची माहिती मिळाली. या माहितीनंतर कृषी भरारी पथकाने कारवाईचे आदेश दिले. शेतकरी दत्तात्रय लिंबराज तावरे यांच्या शेतातील पोल्ट्री शेडमध्ये छापा टाकला.

या कारवाईमध्ये ४५६ रासायनिक खतांची पोते भरारी पथकाला मिळाली. खत कोणत्याही परवान्याशिवाय साठवलं असल्याचं तपासणीत समोर आलं. कृषी विभागाने तीन खतांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली आहेत. तपासणीनंतर संबंधित खताचा अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर खताचा दर्जा तपासून पुढील कारवाई करण्यात येईल, असंही कृषी विभागाने सांगितलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT