Nashik Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Rain Update : इगतपुरीत संततधार; इतर तालुक्यांत उघडीप

Nashik Heavy Rain : नाशिक जिल्ह्याचा पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून इगतपुरी, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.

Team Agrowon

Nashik Rain News : नाशिक जिल्ह्याचा पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून इगतपुरी, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र हा जोर सोमवारी (ता. ३) कमी झाल्याचे दिसून आले. इगतपुरी तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. तर इतर तालुक्यांत अधूनमधून हलक्या सरी बरसल्या.

पूर्व भागातील शेतकरी प्रामुख्याने दमदार पावसाची वाट आहेत. काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी थोड्याफार पावसाच्या भरवशावर पेरणी केल्याने आता पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरगाणा, पेठ व इगतपुरी तालुक्यांत अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे भात उत्पादक पट्ट्यात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने कामांना गती आली आहे.

सोमवारी (ता. ३) सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात झाली. इगतपुरी व घोटी महसूल मंडलांत ४९.३ मिमी पावसाची नोंद झाली.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपूर्वी असलेला पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणांमध्ये होणारी पाण्याची आवकही कमी झाल्याचे एकंदरीत स्थिती आहे. दिवसभर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर अनेक ठिकाणी ऊन-सावलीचा खेळ दिसून आला.

पावसाने उघडीप दिली आहे. पावसाचा जोर ओसरल्याने शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

पेरण्यांना अद्याप गती नाहीच

जिल्ह्याच्या पूर्व भागातील देवळा, येवला, चांदवड या तालुक्यांत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पेरणी योग्य पाऊस अनेक भागांत अद्याप झालेला नाही. मात्र असे असताना काही शेतकरी पावसाच्या ओलीवर पेरण्या करत आहेत. अपेक्षित गती अद्याप आलेली नाही.

सध्या पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र झालेल्या पावसाच्या भरवशावर सध्या पेरण्या केल्या जात आहेत. पुढील हंगामातील पिके वेळेवर घेतली जावी यासाठी खरिपातील पेरा लवकर उरकून घेण्याची लगबग सुरू आहे.
भगवान जाधव, शेतकरी, सुभाषनगर, ता. देवळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Assembly Speaker Controversy: विधानसभा अध्यक्षांचे वर्तन घटनाबाह्य

Land Acquisition Protest: पुरंदर विमानतळ भूसंपादनाला विरोध

APMC Investigation Report: बाजार समिती चौकशी अहवाल मोघम, त्रोटक

Land Record Reform: खातेदाराच्या नावासमोर त्याच्या स्वतंत्र हिश्शाची होणार नोंद

Cotton Farmer Issue: स्लॉट बुक होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

SCROLL FOR NEXT