Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : भरपाई न मिळाल्यास रस्त्यावर उतरू

Post Monsoon Rain : खरीप हंगामातील कापूस, तूर अशी पिके शिवारात उभी आहेत. मजुरांच्या उपलब्धतेअभावी कापूस वेचणीला ब्रेक लागला आहे.

Team Agrowon

Wardha News : देवळी तालुक्‍यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले. त्याची दखल घेत शेतकऱ्यांना पिकविम्यासह शासनाकडून अनुदानस्वरूपात भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

खरीप हंगामातील कापूस, तूर अशी पिके शिवारात उभी आहेत. मजुरांच्या उपलब्धतेअभावी कापूस वेचणीला ब्रेक लागला आहे. अशातच आलेल्या पावसामुळे बोंडातील कापूस भिजत कापसाचा दर्जा खालावला. बाजारात कापसाला आधीच दर कमी आहेत. अशातच आता कापसाची प्रत खालावल्याने हे दर आणखी कमी होतील.

फुलोऱ्यावर तर काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत तूर आहे. पावसामुळे तुरीचा फुलोरा गळून पडला तर काही ठिकाणी तुरीचे पीक आडवे झाल्याने त्याचाही परिणाम उत्पादकतेवर होणार आहे. रबी हंगामात काही शेतकऱ्यांनी हरभऱ्याची लागवड केली होती. पावसाचा फटका बसल्याने हरभरा उत्पादकही हवालदील झाले आहेत.

या साऱ्याची दखल घेत सर्व्हेक्षण, पंचनाम्याच्या कामाला गती मिळावी. त्याआधारे भरपाईचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावा, विमा भरपाईबाबत सध्या कोणत्याच हालचाली नाहीत. विमा कंपनीकडून भरपाईस टाळाटाळ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

विमा भरपाई खात्यात जमा करून शेतकऱ्यांना दिलासा देत त्यांचा रोष कमी करावा, अशा मागण्या देवळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. शेतकरी संघटनेचे माजी युवा आघाडी अध्यक्ष सतीश दाणी, चंदू भोयर, शैलेश डफरे, महेश कचोळे, पद्माकर राऊत यांनी हे निवेदन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT