Onion Subsidy  agrowon
ॲग्रो विशेष

Onion Subsidy : कांदा पिकाचे अनुदान द्या, अन्यथा उपोषण

Onion Market Update : येत्या सात दिवसांत अनुदानाची रक्कम मिळावी. अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी मोताळा तहसीलदारांना निवेदनातून दिला आहे.

Team Agrowon

Buldana News : तालुक्यातील जयपूर येथे गेल्या रब्बी हंगामात अतिवृष्टी व गारपिटीमुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. याचे सर्वेक्षण होऊनही संबंधित शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. येत्या सात दिवसांत अनुदानाची रक्कम मिळावी. अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी मोताळा तहसीलदारांना निवेदनातून दिला आहे.

तालुक्यातील जयपूर येथे रब्बी हंगामात अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतातील कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. जयपूर येथील तलाठी व कोतवाल यांनी शेतातील कांदा पिकाचा सर्व्हे केला आहे.

परंतु शेतकऱ्यांना शासनाकडून कांदा पिकासाठी मिळणारे अनुदान अद्यापही मिळाले नाही. सदर अनुदानाबाबत संबंधित तलाठी व कोतवाल यांना विचारणा केली असता, त्यांनी आर्थिक मागणी केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. त्यांनी या शेतकऱ्यांची नावे अनुदानाच्या यादीत समाविष्ट केली नसल्याचे निवेदनात नमूद आहे.

या प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात यावी. तसेच येत्या सात दिवसांत संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात यावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर सारंगधर सातव, श्रीकृष्ण सातव, निवृत्ती सातव, रवींद्र जुनारे, शालीग्राम इंगळे, त्र्यंबक सातव, राजेंद्र दाते, भागवत बाजोडे, रमेश न्हावकर, अमोल दाते, कमलाबाई निमकर्डे, सय्यद साबीर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT