Hunger Strike Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Debt Relief : कर्जमुक्तीसाठी मंगरूळ येथे साखळी उपोषण

Farmer Hunger Strike : शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, या मागणीसाठी घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथे शेतकऱ्यांनी २८ डिसेंबर पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

Team Agrowon

Jalna News : या वर्षी शेतकऱ्यांचे सुरवातीला अत्यल्प पावसामुळे तर नंतर अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. आधी अत्यल्प पाऊस पडल्याने खरीप हंगामात जेमतेम उत्पन्न हाती आले. यातही शेतीमालाचे भाव घसरलेलेच. यामुळे शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, या मागणीसाठी घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथे शेतकऱ्यांनी २८ डिसेंबर पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. ते मंगळवारीही (ता. २) सुरू होते.

जून हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा महिना. परंतु यावर्षी सुरवातीपासूनच कोठेच जोरदार पाऊस पडला नाही. जेमतेम पावसावरच शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरण्या कराव्या लागल्या. मध्यंतरी पावसाच्या खंडामुळे शेती पिकली नाही. तुटपुंजे उत्पादन हाती आलेल्या शेतीमालाला भावही मिळत नाही. पीकविमा किंवा कुठले शासकीय अनुदानही मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आलेला आहे.

या उपोषणात रामप्रसाद खरात, गणेश कुंडरे, दादाराव मुठाळ, संजय मुंजाळ, नानासाहेब राखुंडे, अप्पासाहेब मुठाळ, शरद राखुंडे, दिनकरराव खरात, धर्मराज राखुंडे, नारायण खरात, गजानन कुंडरे, बंडुराव खरात, संभाजी खरात, सुधाकर

खरात, दिलीपराव खरात, रघुनाथ खरात, रमेश खरात, राजाभाऊ खरात आदींसह मंगरूळ येथील गावकरी सहभागी झाले आहेत. या वर्षाच्या रब्बी हंगामात देखील पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशा मोठ्या घोषणा केल्या.

प्रत्यक्ष मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशेशिवाय काही आलेले नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना शासनाने पीक कर्ज सरसकट माफ करून दिलासा द्यावा, या मागणीसाठी मंगरूळ येथे घनसावंगी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बेमुदत साखळी उपोषण चालू करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT