Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : सातारा जिल्ह्यात रब्‍बीत शंभर टक्के पेरणी

Rabi Season : रब्बी हंगामास पोषक वातावरणामुळे रब्बी पेरणी वेळेत सुरू झाल्याने या हंगामात शंभर टक्के पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Satara News : रब्बी हंगामास पोषक वातावरणामुळे रब्बी पेरणी वेळेत सुरू झाल्याने या हंगामात शंभर टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मका, गहू, हरभरा पिकांची सरासरी इतक्या क्षेत्रावर पेरणीची कामे उरकली आहेत. माण तालुक्यात सर्वाधिक ४६,७६५ क्षेत्रावर पेरणी झाली असून, उगवण चांगली झाली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी दोन लाख १३ हजार २०९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, यापैकी दोन लाख १५ हजार २६७ हेक्टरवर पेरणीची कामे झाली आहेत. यामध्ये रब्बी ज्वारीचे एक लाख ३५ हजार ५५३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी एक लाख ३० हजार १०१ हेक्टर पेरणी झाली आहे.

गव्हाचे सर्वसाधारण ३७ हजार ३७४ हेक्‍टर क्षेत्रापेक्षा जास्त ४० हजार २२६ हेक्टरवर लागवड झाली आहे. मक्याचे १० हजार ११७ हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त १५ हजार २५० हेक्टर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे २७ हजार ७५३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त २७ हजार ८२७ पेरणी झाली आहे.

गहू, हरभरा, मका या पिकांची शंभर टक्क्यांपेक्षा जास्त, तर रब्बी ज्वारीची ९५.९९ टक्के पूर्ण झाली आहे. थंडी व पावसामुळे पिकांच्या अवस्था चांगल्या आहेत. दुष्काळी तालुक्याचा हा हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यात जास्त पेरणी झाली आहे. कांदा पिकांस समाधानकारक दर मिळाल्याने कांदा लागवड करण्याकडे कल वाढला आहे.

जिल्ह्यात १६ ते १७ हजार क्षेत्रावर कांदा लागवड

जिल्ह्यात माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा, वाई या सहा तालुक्यांत १५,५३९ हेक्टरवर लागवड झाली आहे. अजूनही कांदा लागवड सुरू आहे. पश्‍चिमेकडील सातारा, कऱ्हाड, पाटण या तालुक्यांत कांदा लागवड केली जात आहे.

या परिसरात माडा तसेच आंतरपीक म्हणून कांदा केला जात आहे. सध्या लागवडीचा वेग बघता जिल्ह्यात एकूण १६ ते १७ हजार क्षेत्रावर कांदा लागवड होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.खरिपात अतिपावसाने नुकसान झाल्याने रब्बी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांचा आशा वाढल्या आहेत.

तालुकानिहाय पेरणी हेक्टरमध्ये

सातारा १५,४९१

जावळी ७०२७

पाटण १७,४४०

कऱ्हाड १४,३४२

कोरेगाव २१,३३४

खटाव ३३,९९६

माण ४६,७६५

फलटण ३१,१७८

खंडाळा १३,४६५

वाई १३,५६९

महाबळेश्वर ६६८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT