Onion Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seed : कांदा बियाणे विक्रीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

MPKV Rahuri : जिल्ह्यातील राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहिल्यानगर-पुणे रस्त्यावरील कृषी संशोधन केंद्र (चास) व कृषी संशोधन केंद्र, सावळीविहीर (ता. राहाता) या ठिकाणी फुले समर्थ बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले.

Team Agrowon

Ahilyanagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. शरद गडाख व संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. नितीन दानवले यांच्या देखरेखीखाली विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रात ‘फुले समर्थ’ या कांदा बियाण्याची विक्री सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी कांदा बियाणे विक्रीला शेतकऱ्‍यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

कांदा बियाणे विक्रीच्या सुलभतेसाठी विद्यापीठाने यावर्षी कांदा उत्पादक असणाऱ्या नाशिक, अहिल्यानगर व सातारा जिल्ह्यांतील विद्यापीठाच्या अनेक केंद्रांमध्ये बियाणे विक्री व्यवस्था करण्यात आली. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, निफाड, कांदा लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, कृषी महाविद्यालय, मालेगाव या ठिकाणी विक्री करण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, कृषी विज्ञान केंद्र, धुळे, कृषी महाविद्यालय, पुणे येथेही विक्री होत आहे. जिल्ह्यातील राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहिल्यानगर-पुणे रस्त्यावरील कृषी संशोधन केंद्र (चास) व कृषी संशोधन केंद्र, सावळीविहीर (ता. राहाता) या ठिकाणी फुले समर्थ बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे ७२८८ किलो बियाणे व उर्वरित नऊ जिल्ह्यातील विक्री केंद्रामध्ये ३७१२ किलो, असे मिळून ११ टन कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रसारण केंद्राने दिली. बदलत्या युगात ऑनलाइन, तसेच डिजिटल पेमेंटची सुविधा विद्यापीठाच्या बियाणे विभागामार्फत केलेली नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांची गैरसोय झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT