Agrowon Grape Expo Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Grape Expo : शेतकरी, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने फुलले प्रदर्शन

Grape Farming : या प्रदर्शनामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञानासह उपयुक्त माहिती एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Team Agrowon

Nashik News : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषिज्ञानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘सकाळ-ॲग्रोवन’ने तीनदिवसीय द्राक्षविषयक कृषी प्रदर्शनाचे आयोजन ठक्कर डोम, एबीपी सिग्नलजवळ, त्र्यंबक रोड, नाशिक येथे संपन्न होत आहे. शनिवारी (ता. ३०) प्रदर्शनाची सुरुवात झाली.

यानिमित्ताने नाशिक जिल्ह्यासह द्राक्ष पट्ट्यातील शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी शेतकरी व कृषी विद्यार्थी यांची गर्दी होत आहे. या प्रदर्शनामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञानासह उपयुक्त माहिती एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर यादरम्यान तीनदिवसीय द्राक्ष प्रदर्शन संपन्न होत आहे.

प्रदर्शनामध्ये नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला असून, त्यांच्या माध्यमातून द्राक्ष पिकासाठी विविध टप्प्यांवर लागणाऱ्या उपयुक्त निविष्ठा तंत्रज्ञान यांत्रिकीकरण यांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी सहभागी कंपन्यांनी केली आहे. कृषी निविष्ठा फवारणी यांत्रिकीकरण, द्राक्ष बाग उभारणी, द्राक्ष रोपांच्या निर्मितीच्या विविध आधुनिक पद्धती पाहायला मिळत आहे.

नामवंत कंपन्यांनी रासायनिक व जैविक अशा दोन्ही प्रकारच्या निविष्ठा कंपन्यांनी मांडल्या आहेत. रासायनिक व जैविक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके, रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके यांची मांडणी केली आहे.

प्रदर्शनामध्ये मधमाशीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी बसवंत मधमाशी उद्यान यांच्या माध्यमातून मधमाशी व्यवसायातील संपूर्ण माहितीचे सादरीकरण करण्यात आले आहे. आकर्षक स्टॉल्सची मांडणी प्रदर्शनात करण्यात आल्याने भेट देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

द्राक्ष पिकामध्ये गेल्या काही वर्षांत अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मात्र द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची गरज ओळखून ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून आगळे वेगळे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी हंगामाच्या सुरुवातीलाच उपयुक्त ठरणार आहे.
- कैलास भोसले, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT