Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : कृषी विभाग फेरसर्वेक्षण कशाचे करणार?

Agriculture Department : आगामी निवडणुका पाहता शासनाने फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. आता कृषी विभाग कशाचे सर्वेक्षण करणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Team Agrowon

Yavatmal News : जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना पीकविम्याची अत्यंत तोकडी रक्कम देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी आहे. आगामी निवडणुका पाहता शासनाने फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. आता कृषी विभाग कशाचे सर्वेक्षण करणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. हा केवळ देखावा असल्याचा आरोप विरोधकांचा आहे.

जिल्ह्यातील ५९ हजार ४०४ शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाईचे ४१ कोटी रुपये प्राप्त झाले. त्यापैकी काही शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली. नऊ हजार ७२७ शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी नुकसानभरपाई मिळाली.

जिल्ह्यात ७८ शेतकऱ्यांना तर दहा रुपयांपेक्षा कमी भरपाई पीकविमा कंपन्यांनी दिली. त्यामुळे पीकविमा कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. या विषयावर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आक्रमक आंदोलन केले होते.

पीकविमा कंपनीच्या व्यवस्थापकास काळे फासत मारहाण केली. शेतकऱ्यांमध्ये वाढत असलेला रोष कमी करण्यासाठी जिल्ह्यात नुकसानीचे फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले. पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार देऊन कार्यवाही व्हावी व ही अन्यायकारक पीकविमा मदत पुन्हा सत्यपरिस्थितीचा अभ्यास करून वाढीव स्वरूपात विमा कंपन्यांनी द्यावी, अशी मागणी केली आहे.

सर्वेक्षण झाल्यावरदेखील पीक पिवळे पडल्याने सरासरी उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले नाही. नुकसानभरपाई प्राप्त शेतकऱ्यांच्या भरपाईविषयक तक्रारी प्राप्त करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, कृषी विभागाला काय द्यायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

नुकसान झाले तेव्हा विमा कंपनीने सर्वेक्षण केले. त्यामुळे त्यांनी वस्तुस्थितीनुसार शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे. दुसरीकडे पीकविमा कंपनीने दिलेला मोबदला योग्य नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT