Tractor Servicing  Agrowon
ॲग्रो विशेष

Tractor Servicing : ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग घरी करणं योग्य?

Tractor Maintenance : ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांच्या शेती मशागतीची चिंता काहीशी संपली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Dhananjay Sanap

Servicing Tractor at Home: ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांच्या शेती मशागतीची चिंता काहीशी संपली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. काही शेतकरी स्वत: ट्रॅक्टर खरेदी करतात. आणि भाडेतत्वावर ट्रॅक्टर चालवतात. परंतु ट्रॅक्टरची योग्य काळजी घेतली नाही, तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेतली तर ट्रॅक्टरच्या अतिरिक्त खर्चात बचत होते.

ट्रॅक्टरच्या महत्त्वाच्या गोष्टी

कोणत्याही वाहनाची खरी क्षमता त्याच्या इंजिनवर अवलंबून असते. आणि इंजिन चांगलं ठेवण्यासाठी महत्त्वाचं असतं इंजिन ऑईल. बहुतांश वेळा शेतकऱ्यांना कोणतं इंजिन वापरावं, याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा की, तुमच्या ट्रॅक्टरचं मॉडेल कोणतं आहे आणि त्याच्या इंजिन क्षमता किती आहे, याचा विचार करून इंजिन ऑईल घ्या. जेणेकरून इंजिन सुरक्षित राहील.

३०० तासानंतर सर्व्हिसिंग

ट्रॅक्टरमध्ये एक ओडोमीटर असतो. आपल्या ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग कधी करावी लागणार, यासाठीची नोंद ठेवण्यासाठी ओडोमीटर फायदेशीर असतो. साधारण असं मानलं जातं की, ज्यावेळी तुमचं ट्रॅक्टर २०० ते ३०० तास शेती काम करतो. त्यावेळी ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करावी. पण अनेकदा शेतकरी सर्व्हिसिंगला टाळाटाळ करतात. त्यामुळे टाळटाळ न करता शेवटच्या सर्व्हिसिंगनंतर कमाल ३०० तास ट्रॅक्टरने शेती मशागत केली असेल तर तत्काळ सर्व्हिसिंग करून घ्या. जेणेकरुन ट्रॅक्टर कमी इंधनात काम करेल.

घरच्या घरी कशी करावी सर्व्हिसिंग?

तुम्हाला तुमच्या ट्रॅक्टरचं ऑइल इंजिन, ग्रीस कॅन, ऑइल फिल्टर, डिझेल फिल्टर बदलण्याची गरज वाटत असेल खरेदी करून ठेवा. सर्व्हिसिंगच्या सुरुवातीला जूनं इंजिन ऑइल बदलून नवीन इंजिन ऑइल टाका. डिझेलचं फिल्टर व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. लक्षात ठेवा, ट्रॅक्टरने ३०० तास शेती काम केल्यास डिझेल फिल्टर बदलून घ्यावा.

एअर फिल्टरची साफसफाई

एअर फिल्टर हा ट्रॅक्टरचं मायलेज चांगलं ठेवतो. त्यामुळे तेही ३०० तासांनी बदलावं. एअर फिल्टरची साफसफाई करताना फिल्टरचा ड्रम साफ करा. त्यानंतर हायड्रॉलिक फिल्टर साफ करा. ब्रेक साफ करण्यासाठी डिझेल वापरा. ट्रॅक्टरचे ब्रेक शक्य असेल तर सर्विस सेंटरवरचं साफ करा. कारण ब्रेक साफ करणं तुलनेनं कठीण काम असतं.

काळजी घ्या

रेडीएटरचा कुलंट तपासून घ्या. तसेच पंख्याचा बोल्ट तपासून घ्या. त्यानंतर ग्रीस आणि ऑइल लावून घ्या. लक्षात ठेवा सर्व्हिसिंग नंतर ट्रॅक्टर सुरू करा आणि मगच धुवून घ्या. तर अशा पद्धतीने घरच्या घरी ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करता येते. परंतु यामध्ये तुम्ही नवखे असाल आणि ट्रॅक्टरच्या कोणत्या भागाला काय म्हणतात, यासारख्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील तर मात्र सर्विस सेंटरवरच सर्व्हिसिंग करणे योग्य राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT