Agriculture Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scheme: सिंचनपंप खरेदीसाठी ४० हजारांपर्यंत अनुदान; पंपसंच खरेदीला मोठा आधार

Irrigation Pump Subsidy: शेतकऱ्यांना विहीरीतील पाणी उपसण्यासाठी मदत म्हणून राज्य सरकार ९०% पर्यंत अनुदान देत आहे. या योजनेअंतर्गत ४० हजारांपर्यंतची मदत मिळणार असून, १० एचपीपर्यंतचे डिझेल किंवा विजेवर चालणारे पंपसंच खरेदी करता येतील.

Roshan Talape

Pune News: शेतकऱ्यांना विहीरीतील पाणी उपसण्यासाठी मदत मिळावी म्हणून राज्य सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून पंपसंच खरेदीसाठी ९०% पर्यंत अनुदान देत आहे. या अनुदानाची रक्कम जास्तीत जास्त ४० हजारांपर्यंत असणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १० अश्वशक्ती (HP) क्षमतेपर्यंतचे डिझेल किंवा विजेवर चालणारे पंपसंच खरेदी करता येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे नवीन विहीर, दुरुस्त केलेली जुनी विहीर, प्लास्टिक अस्तर केलेले शेततळे किंवा इतर पाण्याचा स्रोत आहे, अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने पंपसंच देण्यात येणार आहे. यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा उपसा करणे सोपे होणार आहे. तसेच, पिकांना वेळेवर पाणी देता येईल, त्यामुळे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचा नफा जास्त होईल.

शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

  • सरकारकडून ९०% अनुदान मिळाल्यामुळे पंपसंच खरेदीचा खर्च कमी होईल.

  • पंपसंचाद्वारे विहीर, शेततळे किंवा इतर स्रोतांतून पाणी सहजपणे काढता येईल.

  • योग्य वेळी पाणी मिळाल्याने पिकांची वाढ चांगली होईल आणि नफा वाढेल.

  • कार्यक्षम पंपसंचामुळे पाणी कमी वाया जाईल व पाणीटंचाई कमी होईल.

योजनेसाठी पात्रतेच्या अटी

  • अर्जदार शेतकरी अनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील असावा.

  • महाडीबीटी पोर्टलवरील अर्जासाठी “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” ही अट लागू आहे.

  • दारिद्र्यरेषेखालील (BPL) शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

  • BPL शेतकऱ्यांना ६ हेक्टर मर्यादा लागू नाही.

  • इतर शेतकऱ्यांकडे ०.४० ते ६ हेक्टर दरम्यान शेती असणे आवश्यक.

  • दुर्गम भागातील शेतकऱ्यांकडे ०.४० हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यास, एकत्र अर्ज केल्यास पात्रता मिळते.

  • राज्य सरकारने कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • शेतकरी ओळख प्रमाणपत्र (Farmer ID)

  • जात प्रमाणपत्र

  • बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक

  • BPL प्रमाणपत्र (दारिद्र्यरेषेखालील असल्यास)

  • शेतकरी ओळख क्रमांकामुळे सर्व माहिती उपलब्ध होत असल्याने सातबारा, ८ अ आणि आधार कार्डची गरज नाही.

अर्जाची प्रक्रिया

ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Market Update : अहिल्यानगरच्या बाजारपेठेत तेजी! रताळे, बटाट्यासह पालेभाज्यांना ग्राहकांची मोठी मागणी

Cattle Fodder Camps : पशुधनाचा जीव टांगणीला! चारा छावण्यांबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा; बाळासाहेब थोरातांची मागणी

Fodder Management : दुष्काळाचे संकट! पशुधनाला वाचवण्यासाठी करा चारा-पाण्याचे असे अचूक नियोजन

Latur Gaal Upsa Parvanagi: लातूरमध्ये गाळ उपशास ऑनलाइन परवानगी

Marigold Price Crash : सणासुदीला झेंडूच्या फुलांची मातीमोल विक्री; बाजारात शेतकऱ्यांच्या कष्टाची होतेय अवहेलना!

SCROLL FOR NEXT