Sugarcane Production Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Production : पणदरे येथे शेतकऱ्यांच्या समूह शक्तीचा सन्मान

Latest Agriculture News : शेतकऱ्यांच्या समूह शक्तीतून भविष्यात माळेगाव साखर कारखाना गेटकेन मुक्तीच्या दिशेने जाऊ शकतो, याचे आशादायक उदाहरण यंदा पणदरे पंचक्रोशीमध्ये निर्माण झाले आहे.

Team Agrowon

Baramati News : शेतकऱ्यांच्या समूह शक्तीतून भविष्यात माळेगाव साखर कारखाना गेटकेन मुक्तीच्या दिशेने जाऊ शकतो, याचे आशादायक उदाहरण यंदा पणदरे पंचक्रोशीमध्ये निर्माण झाले आहे. एकरी ८० टनांपासून ते १३७ टन ऊस घेण्यापर्यंत येथील अनेक शेतकरी पोचले आहेत.

या यशस्वी वाटचालीत ऊस विकास अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांची कष्ट करण्याची तयारी दिसून आली. त्या कष्टाची दखल घेत पणदरे पंचक्रोशी शेतकरी मंडळाने माळेगावचे अधिकारी सुरेश काळे व १३७ टन ऊस उत्पादन घेणारे संजय यशवंत जगताप यांचा मानपत्र देऊन सन्मान केला.

या प्रसंगी झालेल्या मानपत्र वाचनातून अधिकारी काळे, शेतकरी जगताप यांचा शिवारातील जीवन पट उपस्थितांच्या समोर आला. या वेळी अनेकांनी एकरी शंभर टनांपर्यंत ऊस घेण्याचा निर्धार केला.

पणदरे (ता. बारामती) पंचक्रोशी शेतकरी मंडळाच्या वतीने माळेगावचे ऊस विकास अधिकारी सुरेश काळे, प्रयोगशील शेतकरी संजय जगताप यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, जिल्हा बॅंकेचे संचालक रणजित तावरे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल आदींनी वरील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी सत्कारमूर्ती संजय जगताप यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी शेतकरी मंडळाचे अध्यक्ष के. बी. कोकरे, अमरसिंग जगताप, बी. डी. कोकरे, भगतसिंग जगताप, जे. पी. जगताप, ज्ञानदेव कदम, संभाजी जगताप, बळवंत कोकरे, दिलीप कोकरे, भुजंगराव टेंगले आदींनी ऊसपीक विकासाबाबत निर्णायक भूमिका मांडली.

माळेगावची उचल सर्वाधिक असेल.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर भागांतील साखर कारखाने सध्याला वेगाने उसाचे गाळप करीत आहेत. त्यापैकी अनेक कारखान्यांनी यंदाची पहिली उचल प्रतिटन तीन हजार रुपयांपेक्षा अधिक जाहीर केली आहे. त्यामध्ये माळेगाव कारखान्याची शेतकऱ्यांना देणारी पहिली उचल सर्वाधिक असेल, अशी भूमिका अध्यक्ष केशवराव जगताप यांनी स्पष्ट केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT