Honey Export
Honey Export Agrowon
ॲग्रो विशेष

पुरंदर येथे मध चाचणी प्रयोगशाळा

टीम ॲग्रोवन

पुणे : राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या (National Honey Bee Board) वतीने स्वाती एंटरप्रायझेसने पुरंदर येथे मध पोळे चाचणी (Honey Testing) प्रयोगशाळा स्थापन केली आहे. ही लॅब एफएसएसएआय, बीआयएस आणि अॅगमार्क मानकांनुसार मध (Honey) आणि इतर मधमाशी उत्पादनांच्या सर्व प्रतिजैविक, कीटकनाशके, जड धातू, भेसळ अशा बाबी तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

प्रयोगशाळेचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने नुकतेच झाले. मध आणि इतर मधमाशी उत्पादनांची चाचणी घेण्यासाठी सर्व प्रगत प्रकारची यंत्रसामग्री आणि तंत्रे या प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत. पुण्यासह इतर जिल्ह्यांतील मधमाशीपालकांनाही या लॅबचा लाभ मिळणार आहे. यामुळे चाचणीचा खर्च कमी होईल, तसेच चाचणीचा वेळही वाचणार आहे. मधमाशीपालक त्यांचे नमुने या प्रयोगशाळेत २४ तास पाठवू शकणार असून, त्यामुळे जास्तीचे कुरिअर शुल्क वाचण्यास मदत होणार आहे.

पुण्यातील स्वाती एंटरप्रायझेस आपल्या तज्ज्ञांद्वारे नैसर्गिक मध आणि इतर मधमाशी उत्पादने तयार करते. संपूर्ण भारतातील मधमाश्‍या पाळणारे आणि ते इतरांकडून मधदेखील घेतात. परंतु सुसज्ज प्रयोगशाळेच्या अभावी ते त्यांची मधमाशी उत्पादने राज्याबाहेर किंवा देशाबाहेर चाचणीसाठी पाठवतात. मध आणि इतर मधमाशी उत्पादनांची गुणवत्ता राखण्यासाठी, सुसज्ज मध चाचणी प्रयोगशाळांची उपलब्धता ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये ही बाब लक्षात घेऊन, एनबीबीने एनबीएचएमअंतर्गत बाहेर पडणाऱ्या लॅबच्या विकासाद्वारे, बळकटीकरणाद्वारे आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी शंभर मिनी मध चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याची तरतूद केली. या लहान उपग्रह मधचाचणी प्रयोगशाळा उपग्रह केंद्राप्रमाणे काम करणार असून मोठ्या प्रादेशिक मधचाचणी प्रयोगशाळेशी संपर्कात राहून काम करणार आहे.

सध्या पुण्यासह इतर कोणत्याही जिल्ह्यात एफएसएसएआय मानकांच्या निर्देशानुसार मध आणि इतर मूल्यवर्धित मधमाशी उत्पादनांच्या सर्व बाबींची चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध नाही. त्यामुळे मधमाशीपालक त्यांचे मध आणि मधमाशी उत्पादने आंतरराज्यात, परदेशात त्यांच्या उत्पादनाची चाचणी घेण्यासाठी पाठवतात. यामध्ये वेळ आणि वाढता आर्थिक खर्च ही मुख्य अडचण लक्षात घेऊन मधमाशीपालन करणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही प्रयोगशाळा स्थापन केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT