Amit Shah Agrowon
ॲग्रो विशेष

India-Pakistan Tension: सीमांच्या आणि विमानतळांच्या सुरक्षेचा गृहमंत्र्यांकडून आढावा

Home Minister Amit Shah: पाकिस्तानकडून भारतीय सीमांवर झालेल्या चिथावणीखोर हल्ल्यांनंतर, गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा तसेच विमानतळ सुरक्षेच्या बाबतीत उच्चस्तरीय बैठक घेतली.

Team Agrowon

New Delhi News: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने भारतीय सीमांवर केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (ता.९) उच्चस्तरीय बैठकीत सीमारेषा तसेच विमानतळांच्या सुरक्षेचा आढावा घेतला.

गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) महासंचालक तसेच गुप्तचर विभागाचे प्रमुख यांच्यासह गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नियंत्रण रेषेवर रेषेवर पाकिस्तानकडून जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूँछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

पाकिस्तानकडून सुरू असलेल्या चिथावणीखोर हल्ल्यांमुळे सीमाभागातील राज्यांमधील विमान वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठीच्या संभाव्य उपाययोजनांची तसेच विमानतळांच्या सुरक्षेबाबत बैठकीत चर्चा झाली.

गृह खात्याचे राज्यांना पत्र

भारत-पाकिस्तान तणाव वाढत असताना गृह मंत्रालयाने शुक्रवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना १९६८ च्या नागरी संरक्षण कायदा आणि नियमांनुसार नागरी संरक्षण उपाययोजना लागू करण्यास सांगितले आहे.

यासंदर्भात गृह खात्याने सर्व राज्यांना पत्र पाठविले असून ‘नागरी संरक्षण नियम-१९६८’ च्या कलम-११ अन्वये राज्यसरकारांनी नागरिकांचे, मालमत्तांचे संरक्षण तसेच महत्त्वाच्या सेवा सुरळीत राखण्यासाठी कार्यवाही करावी असे त्यात म्हटले आहे. सोबतच, राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशांमधील नागरी संरक्षण संचालकांना आपत्कालीन खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT