Hirda Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Compensation : चक्रीवादळात नुकसान झालेल्या हिरडा पिकाला मिळणार भरपाई

Team Agrowon

Pune News : आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत जून २०२० मध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळात हिरडा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर किसान सभेने या चार वर्षांमध्ये केलेली आंदोलने, पायी मोर्चा, धरणे आंदोलन, उपोषणामुळे नुकसानीपोटी राज्य सरकारने १५ कोटी रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. आदिवासी बांधवांचे प्रमुख साधन असलेल्या बाळ हिरड्याला पहिल्यांदाच नुकसान भरपाई मिळण्याचा निर्णय झाला आहे.

आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील ६५ गावांतील सुमारे ३ हजार ८६५ शेतकरी बांधवांना सुमारे १५ कोटी ४८ लाखांची मदत मिळणार असल्याचे किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे यांनी सांगितले. आदिवासी नागरिकांचे हिरडा हे मुख्य उत्पन्नाचे स्रोत असून दर वर्षी यातून चांगले उत्पन्न मिळते. ३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हिरडा पीक वनउपजतमध्ये येत असल्याने याचे पंचनामे करण्यात अडचणी येत होत्या. मात्र त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन पंचनामे करायला लावले. मात्र, निसर्ग चक्रीवादळात इतर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली. परंतु हिरड्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी किसान चार वर्षे आंदोलने करून या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता.

अखेर १५ फेब्रुवारीपासून उपविभागीय कार्यालय मंचर येथे बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत गावपातळीवर विविध आंदोलने सुरू केली. शेकडो विद्यार्थ्यांनी घोडेगाव ते मंचर १५ किमी पायी चालत आंदोलनाला पाठिंबा दिला.

या आंदोलनाची दखल घेत शिवजयंतीच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हिरडा नुकसान भरपाई देऊ अशी घोषणा केली. अन् उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडावे असे आवाहन केले. त्या वेळी सहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण स्थगित करून बेमुदत धरणे आंदोलन उपविभागीय कार्यालय मंचर येथे करण्यात आले होते.

दरम्यान, २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हिरडा नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. तसेच सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन स्थगित केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT