Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : पंचगंगा रेणुका शुगर्सची दराबाबत राज्यात मुसंडी

Sugarcane Season : यंदाच्या हंगामात गळितास येणाऱ्या उसाला उच्चांकी प्रतिटन एफआरपीसह ३३०० रुपये दर विनाकपात जाहीर केला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : इचलकरंजी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लि. या कारखान्याने दर देण्यात राज्यात मुसंडी मारली आहे. यंदाच्या हंगामात गळितास येणाऱ्या उसाला उच्चांकी प्रतिटन एफआरपीसह ३३०० रुपये दर विनाकपात जाहीर केला आहे. गेल्‍या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची किनार या उच्चांकी दराला आहे.

गुरुवारी (ता. २३) ऊस दर प्रश्‍नी महामार्ग रोको आंदोलन झाले. जिल्ह्यातील कारखान्यांनी मागील हंगामातील दर व येणाऱ्या हंगामाचा दर जाहीर करून त्या बाबतचे पत्र प्रशासनाला दिल्‍यानंतरच कारखाने सुरू केले जातील अशी भूमिका स्वाभिमानीसह अन्य शेतकरी संघटनांनी घेतली. या नुसार अनेक कारखान्यांनी अशी पत्रे जिल्‍हाधिकाऱ्यांना दिली.

पंचगंगा कारखान्याने मात्र पत्र न दिल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता. २५) दिवसभर कारखान्यासमोर आंदोलन केले. यानंतर सायंकाळी कारखान्याने या दराची घोषणा केली. कै. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी स्थापन केलेला हा कारखाना आहे. सध्या रेणुका शुगर्स या कंपनीने तो चालविण्यास घेतला आहे.

कारखान्याचे सध्‍याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी रेणुका शुगर्सचे कार्यकारी संचालक एस. बी. नेर्लीकर, वरिष्ठ व्यवस्थापक केन मुगळखोड, सी. एस. पाटील, एन. टी. बन्ने, संचालक धनगोंडा पाटील, एम. आर.पाटील, प्रमोद पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक नंदकुमार भोरे यांच्या उपस्‍थितीत कारखाना उच्चांकी दर देत असल्याचे जाहीर केले.

शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर अनेक कारखान्यांनी पुढील हंगामाचा दर ३२०० रुपयांपर्यंत जाहीर केला आहे. अनेक कारखान्यांनी यापूर्वी ३००० ते ३१०० रुपये पर्यंत एफआरपीसहीत दर जाहीर केला आहे. या बाबतचे पत्रही त्‍यांनी प्रशासनास दिले आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व कारखान्यांपेक्षा आणखीन एक पाऊल पुढे घेत कारखाना व्‍यवस्‍थापनाने हा उच्चांकी दर जाहीर केला.

या घोषणेनंतर ऊस उत्पादकांत समाधान पसरले आहे. गेले दोन महिने ऊस पट्ट्यात शेतकरी संघटनांनी आंदोलन तीव्र केले होते. या पार्श्वभूमीवर बहुतांशी कारखान्यांनी ३००० रुपयांच्या वर दर देत ऊस उत्पादकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. दराच्या या स्पर्धेत सध्या तरी पंचगंगा कारखान्याने बाजी मारली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT